नवी दिल्ली : चिप्स हे खूप नाजूक असतात आणि जर ते पॅकेट पूर्णपणे भरले गेले, तर ते आपल्याजवळ पोहोचण्याअगोदरच पॅकिंग, डिलिव्हरी प्रक्रियेतच तुटू शकतात. पॅकेट पॅक केल्यापासून ते बाजारात येऊन आपल्या हातात मिळेपर्यंत चांगले राहण्यासाठी आणि त्याचा चुरा होऊ नये म्हणून चिप्सचे पॅकेट अर्धेच भरलेले असते.
चिप्सच्या पॅकेटमध्ये भरली जाणारी हवा ही नायट्रोजन गॅसपासून भरलेली असते. ही हवा चिप्स खराब आणि नरम पडू देत नाही. ज्यावेळी आपण ते पॅकेट फोडतो तेव्हा ते ऑक्सिजनच्या संपर्कात आल्याने हळूहळू नरम पडू लागतात. चिप्स बनवणार्या कंपन्या या चिप्स ताजे राहून ते नरम पडू नये म्हणून नायट्रोजन गॅस भरतात. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, हा गॅस भरल्यामुळे चिप्सच्या चवीतदेखील वाढ होत असल्याचे म्हटले जाते.