नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय वायुसेनेचे प्रमुख अॅडमिरर अमर प्रीत सिंग यांनी गुरुवारी फॉरवर्ड ऑपरेशनल बेसवरून मिग-29 यूपीजी या बहुउद्देशीय लढाऊ विमानात सोलो सॉर्टी उड्डाण केले. सुरक्षा कारणांमुळे उड्डाण झालेले ठिकाण आणि वेस्टर्न एअर कमांडच्या तळाची नेमकी माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
वायुसेना प्रमुखांनी फॉरवर्ड बेसवरील लढाऊ सज्जतेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. भारतीय वायुसेना अत्याधुनिक क्षमता आणि सज्जतेसह कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी तयार असल्याचा संदेश या उड्डाणातून देण्यात आला. उड्डाणानंतर त्यांनी अधिकार्यांशी संवाद साधत ऑपरेशनल तयारीचा आढावा घेतला. जवानांशीही त्यांनी चर्चा केली. या भेटीत फॉरवर्ड बेसवरील लढाऊ सज्जता आणि मिशन तयारीवर विशेष भर देण्यात आला.
* हे सोव्हिएत संघाने विकसित केलेले मिगचे अद्ययावत व्हर्जन
* चौथ्या पिढीतील ‘एअर सुपीरिअरिटी’ फाईटर
* आधुनिक एव्हिऑनिक्स, रडार आणि हवेतच इंधन भरण्याची क्षमता
वेग : सुमारे 2,465 किमी/तास
चढाई दर : 330 मीटर प्रति सेकंद
* 17,000 मीटर उंचीपर्यंत झेप घेऊ शकते
* हवेतून हवेत, हवेतून जमिनीवर शस्त्रास्त्रे वापरण्याची क्षमता
* अचूक गोळाबारूद डागण्याची क्षमता