विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) सरकारच्या बाजूने मतदान केल्यामुळे AIADMK प्रमुख ईडापड्डी के. पलानीस्वामी (EPS) यांनी १३ विद्यमान आमदारांसह २९ नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. Pudhari.
राष्ट्रीय

AIADMK Split Tamil Nadu|तामिळनाडूत विश्वासदर्शक ठरावानंतर AIADMK मध्ये फूट! १३ विद्यमान आमदारांसह २९ नेत्यांवर कारवाई

सी. व्ही. षणमुगम यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

पुढारी वृत्तसेवा

AIADMK Split Tamil Nadu

चेन्‍नई : विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) सरकारच्या बाजूने मतदान केल्यामुळे AIADMK प्रमुख ईडापड्डी के. पलानीस्वामी (EPS) यांनी मोठी कारवाई केली आहे. पक्षादेश धुडकावून क्रॉस वोटिंग करणाऱ्या सी. व्ही. षणमुगम आणि एस. पी. वेलुमणी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना पक्षाच्या पदांवरून हटवण्यात आले आहे.

१३ विद्यमान आमदारांसह २९ नेत्यांवर कारवाई

AIADMK प्रमुख ईडापड्डी के. पलानीस्वामी यांनी १३ विद्यमान आमदारांसह एकूण २९ नेत्यांची जिल्हा सचिव आणि इतर महत्त्वाच्या पदांवरून हकालपट्टी केली आहे. यामध्‍ये आर. कामराज, सी. विजयभास्कर, थंगमणी, के. पी. अनबझगन, के. सी. वीरमणी आणि एम. आर. विजयभास्कर यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे.

AIADMK च्‍या २५ आमदारांनी केली टीव्हीके सरकारच्या बाजूने मतदान

विधानसभेत झालेल्या विश्वासदर्शक ठरावात २५ AIADMK आमदारांनी टीव्हीके (TVK) सरकारच्या बाजूने मतदान केले. यामुळे अभिनेता विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विधानसभेत सहज बहुमत सिद्ध केले.

विजय यांनी जिंकला ४४ आमदारांच्या पाठिंब्यासह विश्वासदर्शक ठराव

२३४ सदस्यांच्या विधानसभेत विजय यांच्या पक्षाने १०८ जागा जिंकल्या होत्या, बहुमताच्या आकड्यापेक्षा (११८) कमी होत्या. मात्र, काँग्रेस, डावे पक्ष, IUML आणि AIADMK मधील बंडखोर गटाच्या मदतीने सरकारने १४४ आमदारांच्या पाठिंब्यासह विश्वासदर्शक ठराव जिंकला.

अण्‍णाद्रमुकमधील पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर

विश्वासदर्शक ठरावानंतर ज्येष्ठ नेते सी. व्ही. षणमुगम यांनी थेट पलानीस्वामी (EPS) यांच्याविरुद्ध बंड पुकारले. ईपीएस यांनी पक्षाची मूळ विचारसरणी सोडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आता AIADMK प्रमुख ईडापड्डी के. पलानीस्वामी यांनी १३ विद्यमान आमदारांसह एकूण २९ नेत्यांची जिल्हा सचिव आणि इतर महत्त्वाच्या पदांवरून हकालपट्टी केल्‍याने AIADMK मधील अंतर्गत पेच आता अधिक गडद झाला असून तामिळनाडूच्या राजकारणाला नवीन वळण मिळाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT