AI Pudhari
राष्ट्रीय

AI curriculum classes 9 to 12 | नववी ते बारावीसाठी 'एआय' अभ्यासक्रम

'एनसीईआरटी'चा २० तासांचा नवा उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (एनसीईआरटी) इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'कॉम्प्युटेशनल थिंकिंग' (सीटी) आणि 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' (एआय) या विषयांवर आधारित २० तासांचा विशेष अभ्यासक्रम सुरू केला आहे. आयआयटी मद्रास, आयआयटी जोधपूर आणि एनसीईआरटीच्या तज्ज्ञांनी हा कृती आधारित अभ्यासक्रम विकसित केला असून विद्यार्थ्यांना एआयचे स्वरूप, फायदे-तोटे आणि सुरक्षित वापराचे धडे देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.

एनसीईआरटीने विद्यार्थ्यांना स्पष्ट सूचना दिली आहे की, कोणत्याही एआय टूलमध्ये आधार क्रमांक, पॅन कार्ड, पासवर्ड, ओटीपी किंवा खासगी कागदपत्रे यांसारखा संवेदनशील डेटा टाकू नये. तंत्रज्ञान वापरताना मानवी निर्णयक्षमता, सर्जनशीलता आणि नैतिक जबाबदारी केंद्रस्थानी राहिली पाहिजे, यावर भर देण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम डिजिटल उपकरणे उपलब्ध नसतानाही शिकवला जाऊ शकतो.

अभ्यासक्रमाचे स्वरूप आणि ५ युनिटस्ची विभागणी विद्यार्थ्यांना एआय सिस्टीमवर आंधळेपणाने अवलंबून न राहता तिचे योग्य मूल्यमापन करता यावे, यासाठी ५ युनिटस् तयार करण्यात आली आहेत.

  • १. दैनंदिन जीवनातील एआय : स्मार्टफोनमधील प्रेडिक्टिव्ह कीबोर्ड आणि म्युझिक अॅप्समधील शिफारशी यांसारख्या रोजच्या उदाहरणांवरून एआय समजावणे.

  • २. मशिन लर्निंग प्रक्रिया : कॉम्प्युटर उदाहरणांवरून कसे शिकतात, इमेज क्लासिफायर्सचे प्रशिक्षण आणि डेटाचा एआयच्या कार्यक्षमतेवर होणारा परिणाम.

  • ३. व्हेन एआय गेटस् इट राँग: चुकीची माहिती, डीपफेक आणि एआयच्या चुका समजून घेणे तसेच माहिती पडताळण्यासाठी ५ पायऱ्यांची पद्धत शिकणे.

  • ४. डेटा गोपनीयता व डिजिटल सुरक्षा : भारताच्या डिजिटल पर्सनल डेटा

  • प्रोटेक्शन कायदा २०२३ ची ओळख आणि वापरल्या जाणाऱ्या अॅप्सच्या प्रायव्हसी पॉलिसीचे विश्लेषण.

  • ५. प्रॉम्प्ट रायटिंग व आऊटपुट पडताळणी : प्रभावी प्रॉम्प्ट तयार करणे, एआयने दिलेल्या उत्तरांमधील त्रुटी दुरुस्त करणे आणि स्वतःच्या विचारक्षमतेला पर्याय न मानता एआयला केवळ सहायक म्हणून वापरणे.

१) एनसीईआरटीने आयआयटी मद्रास व जोधपूरच्या सहकार्याने इयत्ता नववी ते बारावीसाठी २० तासांचा एआय अभ्यासक्रम आणला आहे.

२) हा अभ्यासक्रम एकूण ५ युनिटस्मध्ये विभागलेला असून तो प्रामुख्याने प्रत्यक्ष कृती आणि अनुभवांवर आधारित आहे.

३) 'व्हेन एआय गेटस् इट राँग' या घटकाद्वारे डीपफेक, चुकीची माहिती आणि सत्य पडताळणीची पद्धत शिकवली जाईल.

४) विद्यार्थ्यांच्या डिजिटल सुरक्षेसाठी आधार, पॅन, पासवर्ड यांसारखी संवेदनशील माहिती एआय साधनांमध्ये न देण्याचा इशारा देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT