Ahmedabad Plane Crash black box Pudhari
राष्ट्रीय

Ahmedabad plane crash : 'ब्लॅक बॉक्स'मधून डेटा रिकव्हर करण्यात यश'

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची माहिती

पुढारी वृत्तसेवा

अहमदाबादमध्‍ये १२ जून २०२५ रोजी एअर इंडियाचे विमान कोसळले. या भीषण अपघातानंतर सापडलेल्या ब्लॅक बॉक्समधून २४ जून रोजी क्रॅश प्रोटेक्शन मॉड्यूल (CPM) सुरक्षितपणे काढण्‍यात आले. बुधवार, २५ जून रोजी ब्लॅक बॉक्समधील डेटा डाउनलोड करण्यात आला आहे, अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने आज एका निवेदनाच्‍या माध्‍यमातून दिली आहे.

१२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणार्‍या एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ विमान एका वैद्यकीय वसतिगृह संकुलात कोसळले. विमानातील २४१ प्रवाशांसह २७० ​​हून अधिक लोक या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले होते. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने निवेदनात म्‍हटलं आहे की, "१२ जून रोजी अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडिया ड्रीमलाइनरच्या . "(ब्लॅक बॉक्स) डेटाचे विश्लेषण सुरू आहे. अपघाताला कारणीभूत असलेल्या घटनांचा क्रम पुन्हा तयार करणे आणि विमान वाहतूक सुरक्षा वाढविण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी हे महत्त्‍वपूर्ण आहे."

ब्लॅक बॉक्समधून डेटा डाउनलोड

२४ जूनच्या डीजी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या नेतृत्वाखालील पथकाने आणि (अमेरिकेच्या) राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाच्या (एनटीएसबी) तांत्रिक सदस्यांनी डेटा काढण्याची प्रक्रिया सुरू केली. समोरील ब्लॅक बॉक्समधून 'क्रॅश प्रोटेक्शन मॉड्यूल' (सीपीएम) सुरक्षितपणे मिळवण्यात आला. तसेच २५ जून रोजी मेमरी मॉड्यूल यशस्वीरित्या अॅक्सेस करण्यात आला आणि त्याचा डेटा एएआयबी लॅबमध्ये डाउनलोड करण्यात आला आहे. आता विमान अपघाताची कारणे शोधण्‍यासाठी ही माहिती.महत्त्‍वपूर्ण ठरणार आहे.

'आयएएफ' विमानाने ब्लॅक बॉक्स अहमदाबादहून दिल्लीला

अपघातानंतर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर" (सीव्हीआर) आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) हे अपघातस्थळी इमारतीच्या छतावरील ढिगाऱ्यातून सापडला. त्‍याच्‍या सुरक्षित हाताळणी, साठवणूक आणि वाहतुकीसाठी मानक कार्यपद्धती जारी करण्यात आल्या. अहमदाबादमध्ये ही उपकरणे पोलिस संरक्षण आणि सीसीटीव्ही देखरेखीखाली ठेवण्यात आली होती. त्यानंतर, २४ जून २०२५ रोजी संपूर्ण सुरक्षेसह आयएएफ विमानाने ब्लॅक बॉक्स अहमदाबादहून दिल्लीला आणण्यात आल्‍याचेही निवदेनात म्‍हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT