Agni Prime Missile Launch From Railway :
भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून एक अत्यंत महत्वाचं पाऊल डीआरडीओनं उचललं आहे. त्यांनी इंटरमीडिएट रेंज अग्नी प्राईम या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. विशेष म्हणजे हे क्षेपणास्त्र रेल्वेवर आधारीत मोबाईल लाँचिंग द्वारे सोडण्यात आलं होते. याची चाचणी पूर्णपणे यशस्वी झाल्याचं सांगण्यात आलं आहे. हे अत्याधुनिक जनरेशनचं क्षेपणास्त्र आहे असं डीआरडीओकडून सांगण्यात आलं आहे.
पहिल्यांदाच विशेष डिझाईन केलेल्या रेल्वे लाँचिंगवरून अग्नी प्राईम हे मिसाईल लाँच करण्यात आलं आहे. त्यामुळं कॅनिस्टराईड लाँच सिस्टम असलेल्या काही ठराविक देशांच्या यादीत आता भारताचा देखील समावेश झाला आहे.
अग्नी प्राईम हे अग्नी सीरिज क्षेपणास्त्रामधील सर्वात अद्यावत क्षेपणास्त्र आहे. हे मध्यम पल्याचे क्षेपणास्त्र असून याची रेंज ही २००० किलोमीटर इतकी आहे. यात कोणते अत्याधुनिक फिचर आहेत ते पाहुयात.
अचूक लक्षवेध :
अत्याधुनिक नेविगेशन सिस्टममुळं शत्रूच्या ठिकाणांवर अचूक मारा करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे.
जलद अॅक्शन
हे क्षेपणास्त्र कमी वेळेत लाँच केलं जाऊ शकते.
मजबूत डिझाईन :
कॅनिस्टर म्हणजे एक बंद बॉक्समध्ये हे क्षेपणास्त्र ठेवलं जातं. त्यामुळं पाऊस, धूळ आणि उष्णता यापासून त्याचा बचाव होतो.
भारतानं हे क्षेपणास्त्र स्टॅटेजिग फोर्सेस कमांडसाठी तयार केलं आहे. याचं परिक्षण ओडिसा येथील चांदीपूर इंटिग्रेटेड टेस्टिंग रेंजमध्ये करण्यात आलं. रेल्वे लाँचरवरून हे क्षेपणास्त्र लाँच करता येत असल्यामुळं देशभरात रेल्वेचं जाळं पसरलेल्या कोणत्याही ठिकाणावरून कधीही हल्ला करता येतो.
- DRDO, SFC आणि भारतीय सैन्याने संयुक्तरित्या ही यशस्वी चाचणी पार पाडली.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन करताना सांगितले की, भारत आता त्या निवडक देशांमध्ये आहे ज्यांच्याकडे रेल्वे नेटवर्कवर कॅनिस्टर लॉन्च सिस्टम आहे.
-हा प्रयोग "आत्मनिर्भर भारत" योजनेचा भाग आहे.
-अग्नि मालिकेतील हे सहावे क्षेपणास्त्र असून आधीच इतर क्षेपणास्त्र सेना सेवेत आहेत.
-रणनीतिक ताकद – शत्रूला कुठेही, कधीही प्रत्युत्तर देण्याची क्षमता मिळते.
सुरक्षावाढ – सीमांवर जलद प्रतिक्रिया शक्य होते व घुसखोरी रोखली जाऊ शकते.
जागतिक पातळीवर स्थान – अमेरिका, रशिया यांच्यासारख्या महासत्तांच्या पंक्तीत आता भारतही सामील झाला आहे.
भविष्यातील तैनाती – अग्नि-प्राइम लवकरच सैन्यात औपचारिकरित्या समाविष्ट होणार आहे.