Amazon Kuiper Internet & starlink Pudhari
राष्ट्रीय

Amazon Kuiper Internet | स्टारलिंकनंतर आता ॲमेझॉनचे सॅटेलाईट इंटरनेट भारतात पदार्पणासाठी सज्ज; सुरवातीला मोफत...

Amazon Kuiper Internet | स्टारलिंकचे 6000 तर कुईपरचे 3200 उपग्रह; ग्रामीण भागात स्वस्तात इंटरनेट मिळण्याची शक्यता

Akshay Nirmale

Amazon’s Satellite Internet Project Kuiper Set To Enter India After Starlink

वॉशिंग्टन/नवी दिल्ली: अब्जाधीश एलन मस्क यांच्या Starlink नंतर आता भारता आणखी एक बडा इंटरनेट सेवा पुरवठादार पदार्पणासाठी सज्ज झाला आहे.

तो पुरवठादार म्हणजे ॲमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटचे सर्वेसर्वा जेफ बेझॉस. तर अ‍ॅमेझॉनचा सॅटेलाइट इंटरनेट प्रोजेक्ट 'कुइपर' (Kuiper ) भारतात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.

एकदा सक्रिय झाल्यावर, अ‍ॅमेझॉनचा प्रोजेक्ट 'कुइपर' हा एलॉन मस्कच्या स्टारलिंकनंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सॅटेलाइट इंटरनेट सेवा पुरवठादार बनू शकतो.

दूरसंचार विभाग लेटर ऑफ इंटेंट देऊ शकतो...

अ‍ॅमेझॉनचा हा महत्त्वाकांक्षी सॅटेलाइट इंटरनेट प्रकल्प आहे. हा प्रकल्प लवकरच भारतात सुरू होण्याच्या मार्गावर आहे. त्यासाठी केंद्र सरकारचा दूरसंचार विभाग (DoT) लवकरच ॲमेझॉनला 'लेटर ऑफ इंटेंट' (LoI) देऊ शकतो, जे देशात अधिकृतपणे सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक महत्त्वाचे पाऊल मानले जाते.

देशातील दुसरा सर्वात मोठा इंटरनेट पुरवठादार

ही मंजुरी मिळाल्यानंतर अ‍ॅमेझॉनला GMPCS (Global Mobile Personal Communications by Satellite) परवाना मिळवण्याकडे वाटचाल करता येईल, जो भारतात सॅटेलाइट आधारित इंटरनेट सेवा देण्यासाठी आवश्यक आहे.

सक्रिय झाल्यावर, कुइपर हा एलॉन मस्कच्या स्टारलिंकनंतर भारतात सेवा देणारा दुसरा आंतरराष्ट्रीय सॅटेलाइट इंटरनेट पुरवठादार बनेल.

स्टारलिंकचे 6000 तर कुईपरचे 3200 उपग्रह

स्टारलिंकने आतापर्यंत अवकाशात 6000 हून अधिक सॅटेलाइट्स प्रक्षेपित केले आहेत. त्याच्या तुलनेत, अ‍ॅमेझॉन 3200 हून अधिक लो-अर्थ ऑर्बिट (LEO) सॅटेलाइट्स प्रक्षेपित करण्याची योजना आखत आहे.

हे सॅटेलाइट्स पृथ्वीपासून सुमारे 2000 किलोमीटर उंचीवर परिभ्रमण करतात आणि अवकाशातून हाय-स्पीड इंटरनेट सेवा पुरवतात.

सुरवातीला मोफत इंटरनेट पुरविण्याची शक्यता?

अ‍ॅमेझॉन भारतीय इंटरनेट बाजारपेठेचा बारकाईने अभ्यास करत आहे आणि विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये कमी किमतीचा सॅटेलाइट इंटरनेट देण्याची योजना आखत आहे.

कंपनी स्वस्त, कॉम्पॅक्ट सॅटकॉम डिव्हाईसेस विकसित करत आहे आणि कदाचित ट्रायल फेजमध्ये ती डिव्हाईसेस मोफत किंवा सवलतीत देण्याची शक्यता आहे. हे धोरण मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओच्या टेलिकॉम क्षेत्रातील सुरुवातीच्या योजनेसारखेच आहे.

ट्रायल रननंतर सेवा सुरू करणार

अ‍ॅमेझॉन कुइपर आणि स्टारलिंक (जेफ बेझोस आणि एलन मस्क यांच्याद्वारे समर्थित) दोघेही जिओ फायबरप्रमाणे सुरुवातीला ट्रायल रनद्वारे बाजारपेठ तपासण्याची शक्यता आहे, त्यानंतरच देशभरात सेवा सुरू केली जाईल.

गंमतीशीर बाब म्हणजे, भारताच्या सॅटेलाइट इंटरनेट धोरणानुसार LoI मिळवणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कुइपर ही स्टारलिंकनंतर दुसरी कंपनी ठरणार आहे.

सध्या एअरटेलच्या वनवेब आणि जिओ-SES ला परवाने

TRAI (भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण) ने मे महिन्यात GMPCS साठी नवीन सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. भारतात सेवा सुरू करण्यासाठी ती तत्वे कंपन्यांना पाळावी लागणार आहेत.

भारतीय कंपन्यांमध्ये भारती एअरटेलच्या पाठबळाने सुरू झालेली वनवेब आणि जिओ-SES यांना आधीच GMPCS परवाने मिळाले आहेत.

मात्र अ‍ॅमेझॉन कुईपर आणि स्टारलिंक अद्याप दूरसंचार विभाग (DoT) आणि भारताच्या अवकाश विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या IN-SPACe या सिंगल विंडो रेग्युलेटरकडून अंतिम मंजुरी आणि परवाने मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT