bribe  Pudhari
राष्ट्रीय

Corruption Case: लाच घेताना पकडलं, पुरावे नष्ट करण्यासाठी तलाठ्याने गिळल्या नोटा; CT स्कॅनमध्ये काय समोर आलं?

Patwari swallows bribe notes | जातीच्या दाखल्यासाठी घेतली लाच; गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Dehradun case Patwari swallows bribe notes Vigilance raid

देहरादून : उत्तराखंडमधील देहरादून जिल्ह्यात एक अजब आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील कालसी तहसीलमध्ये कार्यरत असलेल्या तलाठ्याला (पटवारी) 2000 रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (विजिलन्स टीम) रंगेहाथ पकडले.

मात्र पकडले जाताच आरोपीने हुशारी दाखवत 500 रुपयांच्या चार नोटा गिळल्या. पुरावाच गिळल्यामुळे तपास अधिक गुंतागुंतीचा झाला.

पोलिसांनीही हुशारी दाखवत सीटी स्कॅन केले. आणि त्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ही घटना राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. विजिलन्स पथकाने आरोपीविरुद्ध भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

नेमकं काय घडलं?

कालसी तहसीलच्या कोटी डिमोऊ भागात तैनात असलेला पटवारी गुलशन हैदर याने तक्रारदाराच्या चुलत भावांसाठी आवश्यक असलेल्या मूलनिवास व जातीच्या दाखल्यासाठी 2 हजार रुपयांची मागणी केली होती. हे पैसे घेण्यासाठी त्याने तक्रारदाराला संबंधित कागदपत्रांसह तहसील कार्यालयात बोलावले.

तक्रारदाराने याबाबत विजिलन्स विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर विजिलन्स सेक्टर देहरादूनच्या ट्रॅप टीमने पटवारीला खाजगी खोलीत 2 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली.

वैद्यकीय तपासणी

गुलशन हैदरने पकडले जाताच 500 रुपयांच्या चार नोटा तोंडात टाकून चावत गिळून टाकल्या. त्यामुळे त्वरित पुरावे नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला.

विजिलन्स टीमने आरोपीला प्रथम PHC कालसी येथे नेले, जिथे डॉक्टरांनी एंडोस्कोपी तपासणीचा सल्ला दिला. त्यानंतर त्याला विकासनगर उप जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. येथे करण्यात आलेल्या अल्ट्रासाऊंड तपासणीतही नोटा आढळून आल्या नाहीत.

रेडिओलॉजिस्टने पुन्हा एंडोस्कोपी तपासणीची शिफारस केली. त्यानंतर आरोपीला पुढील तपासासाठी देहरादूनला हलवण्यात आले.

पुरावे नसल्याने आरोपीला सोडावे लागले...

दरम्यान, नोटा गिळण्याची ही घटना इतकी जलद घडली की व्हिजिलन्सचे अधिकारी काही करू शकले नाहीत. यानंतर सबळ पुरावे मिळावेत म्हणून पटवारीला तात्काळ रुग्णालयात नेऊन CT स्कॅन करण्यात आले.

परंतु, CT स्कॅनमध्ये पटवारीच्या पोटात नोटा असल्याचे कोणतेही स्पष्ट संकेत मिळाले नाहीत. त्यामुळे या प्रकरणात थेट पुराव्याअभावी आरोपीला सोडण्यात आले.

इतर पुरावे आहेत, गुन्हा दाखल - पोलिस

गुलशन हैदर असे या पटवारीचे नाव असून एवढा गुन्हा करूनही तो त्याच पदावर कार्यरत आहे, ज्या पदावर राहून त्याच्यावर लाच घेण्याचे आरोप झाले आहेत.

मात्र, विजिलन्सचे संचालक डॉ. व्ही. मुरुगेशन यांनी स्पष्ट केले आहे की, "आमच्याकडे इतर पुरावे आहेत आणि आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला गेला आहे. त्याला न्यायालयासमोर हजर करून रिमांडवर घेण्यात आले आहे."

सतर्कता विभागाचे संचालक डॉ. वी. मुरुगेशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पटवारीविरुद्ध भ्रष्टाचार निवारण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांनी सांगितले की, टीमकडे इतर पुरावेही असून, गुन्ह्याची अधिक चौकशी सुरू आहे. या कारवाईसाठी ट्रॅप टीमला रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT