पुढारी ऑलाईन डेस्क : ईशान्य भारतातील मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड राज्यामध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने ६ महिन्यांसाठी सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA ) पुन्हा लागू केला आहे.
मणिपूरच्या ५ जिल्ह्यांतील १३ पोलीस ठाणे क्षेत्र वगळता संपूर्ण राज्यात पुढील ६ महिन्यांसाठी 'अफ्स्पा' वाढवण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेशातील तिरप, चांगलांग आणि लोंगडिंग जिल्ह्यांमध्ये आणि राज्यातील तीन पोलिस स्टेशन क्षेत्रातही'अफ्स्पा' लागू करण्यात आला आहे. नागालँडमधील दिमापूर, निउलंड, चुमोकेदिमा, मोन, किफिरे, नोकलाक, फेक आणि पेरेन येथे AFSPA पुन्हा लागू करण्यात आला आहे.
केंद्रीय गृह मंत्रालय अशांत भागात AFSPA लागू करते. या कायद्यानुसार, सुरक्षा दलांना लक्षणीय अधिकार मिळतात. सुरक्षा दलांना वॉरंटशिवाय कोणालाही अटक करण्याचा अधिकार आहे. तसेच वॉरंटशिवाय परिसरात प्रवेश करण्याचे किंवा झडती घेण्याचे आणि इतर कारवाई करण्याचे अधिकार देतो.