अभिनेते मोहनलाल यांनी वायनाडमध्ये जाऊन पाहणी केली  Twitter
राष्ट्रीय

Wayanad landslides |मानद लेफ्टनंट कर्नल मोहनलाल यांनी वायनाडची केली पाहणी

मानद लेफ्टनंट कर्नल, अभिनेते मोहनलाल यांनी वायनाडला दिली भेट

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळच्या भूस्खलन झालेल्या वायनाडमध्ये निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळाला. नैसर्गिक आपत्तीमध्ये ३०० हून अधिक लोकांचा आतापर्यं मृत्यू झाला आहे. तर हजारों लोक पीडीत आहे. या दुर्घटनेनंतर सर्व स्तरातून संवेदनाएं व्यक्त केल्या जात आहेत. तेथील परिस्थिती पाहण्यासाठी शनिवारी साऊथ चित्रपटांचे प्रसिद्ध अभिनेते मोहनलाल विश्वनाथन नायर यांनी वायनाड (Wayanad) ला भेट दिली. लष्करी वर्दीत त्यांनी मदत शिबिरांचा दौरा केला.

वायनाडमधील भूस्खलन परिस्थितीचा घेतला आढावा

वायनाडमधील पंचिरी मट्टम (Punchiri Mattam) गावात मोहनलाल यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. आता मेप्पडीमध्ये शिबिर दौरा केल्यानंतर भूस्खलनातील ठिकाणांचा दौरा करण्याची अपेक्षा आहे.

वायनाड (Wayanad) मध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन ३० जुलैला झाले होते. आतापर्यंत ३४४ लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. याठिकाणी सातत्याने बचाव कार्य सुरु आहे. जिल्हाभरात राज्य सरकारने एकूण ९१ बचाव कॅम्प उघडले आहेत. त्यापैकी याठिकाणी २,९८१ कुटुंबीयांचील ९ हजार ९७७ लोक राहतात.

मोहनलाल यांना २००९ मध्ये भारतीय प्रादेशिक सेनेत मानद लेफ्टिनेंट कर्नलचे पद देण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT