Sonam Wangchuk arrest :
लडाखमधील पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर जमावाला उकसवणारी वक्तव्य केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सोनम वांगचुक यांनी काही दिवसांपूर्वीच मी या प्रकरणी आनंदानं स्वतःला अटक करून घेण्यास तयार आहे असं वक्तव्य केलं होतं.
केंद्रीय गृह मंत्रालयानं काल वांगचुक यांच्या एनजीओचे सर्व परवाने रद्द केले होते. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या स्टुडंट एज्युकेशन अँड कल्चरल मुव्हमेंट ऑफ लडाख या संस्थेला विदेशातून फंडिंग मिळतं. त्याच्यावर फॉरेन फंडिग अॅक्ट २०१० अंतर्गत करावाई करण्यात आली आहे.
डोंगराळ प्रदेशात कार्यरत असलेल्या वांगचुक यांना २०१८ मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आहे, वांगचुक यांनी केंद्रीय गृह मंत्रालय आणि लडाख केंद्र शासित प्रदेश प्रशासनानं केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
लेह सिटीमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला, तर सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ५० हून अधिक लोक जखमी झाले होते. याचं खापर प्रशासनानं उपोषण करणाऱ्या वांगचुक यांच्यावर फोडलं होतं.
दरम्यान, वांगचुक यांनी आपल्या एनजीओसाठी परदेशातून कोणतीही देणगी घेतलेली नाही. मात्र त्यांनी संयुक्त राष्ट्र संघस स्विस आणि इटालियन संस्थेसोबत व्यवहार केल्याचं सांगितलं. त्यांनी आपण सर्व कर भल्याचं देखील सांगितलं.