राष्ट्रीय

ऑनलाईन गेमिंग कंपन्यांवर ‘ईडी’चे 25 ठिकाणी छापे

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  परदेशात नोंदणीकृत व भारतात कार्यरत असलेल्या ऑनलाईन गेमिंग कंपन्यांविरोधात सक्त वसुली संचालनालयाने देशातील 25 ठिकाणी छापे टाकले. फेमा कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

22 मे आणि 23 मे रोजी देशातील विविध राज्यांत 25 ठिकाणी छापे टाकण्यात आले. दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशात ही कारवाई करण्यात आली. यादरम्यान या सर्व ठिकाणांहून विविध कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली. याशिवाय 19.55 लाख रुपये, 2 हजार 695 डॉलरची रोकड जप्त करण्यात आली. 55 बँक खातीही यादरम्यान सील करण्यात आली.

SCROLL FOR NEXT