Abijit Dipake 
राष्ट्रीय

Abijit Dipake | 'कॉकरोच जनता पार्टी' चे संस्थापक अभिजित दिपके यांना कानशिलात मारली

जयपूर येथे अज्ञात तरुणाने केली दिपके यांना मारहाण

पुढारी वृत्तसेवा

Abijit Dipake जयपूर येथे एका अज्ञात तरुणाने कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या तरुणाने दिपके यांना कानशिलात मारली. आहे. 'कॉकरोच जनता पार्टी'तर्फे शहीद स्मारकावर आंदोलन केल जात होत तेव्हा ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत समर्थकांच्या खांद्यावर असलेल्यसा दिपके यांना एक ते दोन व्यक्ति मारहाण करताना दिसत आहेत.

या आंदोलनावेळी अचानक समोर आलेल्या तरुणाने दिपके यांच्या कानशिलात मारली व यानंतर तो तरुण घटनास्थळावरून पळून गेला. यानंतर अभिजीत दिपके यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून त्या तरुणाचा शोध घेत आहेत.

दरम्यान दिपके यांना मारहान केलेल्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त समोर आले आहे कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके एका आंदोलनात सहभागी होाण्यासाठी जयपूर येथे आले होते. समर्थक खांद्यावर उचलून घोषणा देत होते . त्‍याच वेळी एका व्यक्तीने त्यांना थप्पड मारली. त्‍याचवेळी अभिजीत दीपके आणि त्यांच्या समर्थकांवर तरुणांच्या एका गटाने हल्ला केला. या घटनेनंतर आंदोलनस्थळी गदारोळ माजला होता. घटनेची दखल घेत पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.

हल्ल्याचे कारण अस्पष्ट

कॉकरोच जनता पार्टीतर्फे जयपूरमध्ये नीट पेपरफूटी, शिक्षण व्यवस्थेतील त्रृटी, बेराजगारी या मुद्यांसाठी कॉकरोच जनता पार्टी तर्फ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनाला विद्यार्थी पालक, महिला, युवती यांची मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीमध्ये असलेल्या हल्लेखोरांनी दिपके यांना लक्ष्य केले. दिपके यांचे समर्थक त्‍यांना खांद्यावर घेऊन घोषणा देत होते. यावेळी अनेक जण मोबाईलमध्ये ही घटना चित्रीत करत होते. त्‍याचवेळी अचानक दोघातिघांनी हल्ला केला. थेट दिपके यांच्या गालावर थप्पड मारण्यास सुरवात केली. दिपके यांनी आपले दोन्ही हात वर करुन आपला बचाव केला. पोलिसांनी त्‍यांना ताब्यात घेतले असून, सिसीटिव्ही फूटेजची तपासणी सुरु आहे.

दिपके यांचे शातंता राखण्याचे आवाहन

या घटनेनंतर कॉकरोच जनता पार्टीचे समर्थक, तरुण यांच्यात संतापाची भावना निर्माण झाली आहे. घटनेच्या ठिकाणीही मोठा गोंधळ उडाला होता. पोलिसांनी परिस्थीती हाताळली. यानंतर अभिजीत दिपके यांनी तरुणांना तसेच समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT