File Photo.
राष्ट्रीय

CJP Delhi Protest : अभिजित दिपके, सौरव दाससह आशुतोष रंका यांची सुटका

दिल्‍लीतील आंदोलनापूर्वी घेण्‍यात आले होते ताब्‍यात,

पुढारी वृत्तसेवा

CJP Delhi Protest : दिल्‍लीतील जंतर मंतरवरील आंदोलनापूर्वी अटक करण्‍यात आलेले 'कॉकरोच जनता पार्टी'ने (CJP)चे संस्‍थापक अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्‍या सुटकेचे आदेश आज (दि. ११ ऑक्‍टोबर) कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने दिले.

तिघांच्‍या सुटकेचे कार्यकारी दंडाधिकार्‍यांचे आदेश

दिल्लीत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ताब्यात घेतल्यानंतर दिल्ली कॅन्ट पोलीस ठाण्यात कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. अधिकृत प्रक्रियेनुसार या तिघांना दंडाधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आले.CJP च्या कायदेशीर विभागाच्या प्रमुख रत्ना सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची सुटका करण्याचे आदेश दिले.

कॉकरोच कधीच मरत नाहीत

'कॉकरोच जनता पार्टी'ने (CJP) 'एक्स' (X) वरील एका पोस्टद्वारे त्यांचे संस्थापक अभिजित दिपके, आशुतोष रंका आणि सौरव दास यांच्या सुटकेची घोषणा केली. त्यात म्हटले आहे, "अखेरीस दिल्ली पोलिसांना अभिजित दिपके, आशुतोष रंका आणि सौरव दास यांची सुटका करणे भाग पडले. झुरळे कधीच मरत नाहीत."

दुपारी २ वाजता पत्रकार परिषद घेणार

सीजेपीचे वकील सौतिक बॅनर्जी यांनी 'एएनआय'शी बोलताना सांगितले की, अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना दिल्ली कॅन्ट पोलीस ठाण्यात कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्‍यात आले. कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी त्‍यांच्‍या सुटकेचे आदेश दिले. दरम्‍यान, CJP चे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सांगितले की, "आम्ही दुपारी २ वाजता पत्रकार परिषद घेऊ."

दीपकेंसह दास आणि रांकाना विमानातच घेण्‍यात आले होते ताब्‍यात

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) फोडलेल्या डरकाळीने शनिवारी राजधानी दिल्ली अक्षरशः हादरली. या आंदोलनाच्या निमित्ताने राजधानीच्या रस्त्यांवर संघर्ष दिसून आला. पोलिसांनी शुक्रवारी रात्रीपासूनच आंदोलक व त्यांच्या नेत्यांची धरपकड करीत शेकडो जणांना ताब्यात घेतले. 'सीजेपी'चे प्रमुख अभिजित दीपके व त्यांचे सहकारी सौरव दास, आशुतोष रांका यांना शनिवारी दिल्लीत दाखल होताच विमानातच ताब्यात घेण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT