Abhijeet Dipke Detained Female Police pudhari
राष्ट्रीय

Abhijeet Dipke Detained Female Police: दिल्ली पोलीसांची भन्नाट शक्कल अन् आक्रमक दिपके 'बॅकफूट'वर; विमानात नेमकं काय घडलं?

दिल्ली पोलिसांनी दिपकेसह त्यांच्या साथीदारांना विमानातूनच ताब्यात घेतलं. यावेळी दिल्ली पोलिसांनी मोठी शक्कल लढवली.

Anirudha Sankpal

Abhijeet Dipke Detained By Female Police: कॉकरोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आपले साथीदार आशुतोष रांका, सौरव दास यांच्यासोबत दिल्लीच्या विमानतळावर दाखल झाला होता. तो आजच्या जंतर मंतरवरील आंदोलनासाठी आला होता. मात्र दिल्ली पोलिसांनी दिपकेसह त्यांच्या साथीदारांना विमानातूनच ताब्यात घेतलं. यावेळी दिल्ली पोलिसांनी मोठी शक्कल लढवली. त्यांनी आंदोलकांची रणनिती आत्मसात केल्याची चर्चा आहे.

महिला शक्तीचा वापर

दिल्ली पोलिसांनी दिल्ली विमानतळावरून अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ताब्यात घेतलं. दिल्ली पोलिसांनी यावेळी दिपके आणि त्यांच्या साथीदारांना ताब्यात घेण्यासाठी महिला शक्तीचा वापर केला. त्यांनी यावेळी पुरूष पोलीस अधिकाऱ्यांना नाही तर महिला पोलीस अधिकाऱ्यांना पुढं केलं. त्यामुळं आक्रमक अभिजीत दिपके आणि त्याचे साथीदार यावेळी थोडे नरमाईची भूमिका घेताना दिसले. त्यांनी पोलिसांना हात जोडून स्वतःला अटक करून घेतली.

विमानात यायची काय गरज

अभिजीत दिपकेने यावेळी तुम्हाला विमानात यायची काय गरज होती. हे तुम्ही बाहेर देखील करू शकला असता असं म्हणत हात जोडले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना गेट नंबर ९ मधून विमानतळावरून बाहेर काढलं. आता त्यांना कुठं नेलं आहे याबाबत मात्र माहिती मिळालेली नाही.

फारशी हालचाल करता आली नाही

दिल्ली पोलिसांनी महिला पोलिसांना पुढं केल्यानं या तिघांनाही फारशी हालचाल करण्याची संधी मिळाली नाही. सहसा ताब्यात घेतेवेळी आंदोलन ठिय्या मांडून बसतात त्यावेळी पोलिसांना बळाचा वापर करावा लागतो. मात्र यावेळी महिला पोलीस असल्यामुळं दिपके आणि त्यांचे सहकाऱ्यांना संधी मिळाली नाही. दिपकेने मी अरेस्ट होण्यासाठीच आलो आहे मला तुम्ही अटक करू शकता असं देखील सांगितलं.

दिल्ली पोलिसांनी दिपकेसह इतर नेत्यांना देखील विमानतळावरून ताब्यात घेतलं. दिल्ली पोलिसांनी सीजेपीची लीगल हेड रत्ना सिंहला देखील ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, युट्यूबर ध्रुव राठीला देखील गुरूग्राम येथील त्यांच्या घरातून उचलण्यात आलं होतं. तसेच सीजेपीचे सर्व छोटे मोठे नेते जंतर मंतरवर जाण्यापूर्वीच पोलीस ताब्यात घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT