Abhijeet Dipke file photo
राष्ट्रीय

Abhijeet Dipke Pudhari News | दिवाळीपर्यंत कोणतेही आंदोलन करणार नाही - कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांची घोषणा

Abhijeet Dipke Pudhari News | दीपकेंची घोषणा; कुटुंबसमेवेत राहण्याचा सहकाऱ्यांना सल्ला

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
कॉक्रोच जनता पार्टी दिवाळीपर्यंत कोणतेही आंदोलन करणार नसल्याची घोषणा या पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी केली आहे. आता थोडा ब्रेक घेण्याची आणि काही दिवस कुटुंबासोबत घालवण्याची वेळ आली आहे, असा संदेश दीपके यांनी आपल्या सहकाऱ्यांना व्हिडीओद्वारे मंगळवारी (दि. २०) दिला.

१६ मिनिटांहून अधिक लांबीच्या व्हिडिओ संदेशात दीपके म्हणाले, सध्या मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना फक्त एवढीच विनंती करू इच्छितो की, काही दिवसांसाठी तुम्ही आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा. सण जवळ येत आहेत आणि गेल्या काही दिवसांत जे काही घडले आहे, ते पाहता तुमच्या घरचे लोक नक्कीच खूप चिंतित असतील.'

या व्हिडिओत दीपके यांनी सध्या तिहार तुरुंगात असलेले सौरभ दास व आशुतोष रांका यांचाही उल्लेख केला. सोमवारीच न्यायालयाने या दोघांची न्यायिक कोठडी दोन दिवसांनी वाढवली आहे. सौरभच्या आईशी बोलणे झाल्याचेही त्यांनी सांगितले.

आपण द्वेषाविरुद्ध लढत आहोत. आपण आपल्या मार्गापासून विचलित व्हावे, आपणही द्वेषानेच उत्तर द्यावे, असे काही लोकांना वाटते. पण आपण तसे करणार नाही. आपण गांधींच्या सत्याग्रहाच्या मार्गावर आहोत. आपल्या भावना ही कमजोरी नाही, तर ताकत आहे. आपण घाबरणार नाही, असेही दीपके यांनी म्हटले आहे.

रांका, दास यांची उच्च न्यायालयात धाव

दुसरीकडे जंतर मंतर आंदोलन प्रकरणी न्यायिक कोठडीत असलेले सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी सुटकेसाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कोठडी २१ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्याच्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाला आव्हान याचिकाद्वारे दिले गेले आहे. ही याचिका तात्काळ सुनावणीसाठी घ्यावी, अशी मागणी असून आम्ही न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडून उत्तराची वाट पाहत आहोत, असे सीजेपीच्या रत्ना सिंह यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT