file photo
राष्ट्रीय

‘आप’च्या सात आमदारांचा राजीनामा, पक्षाला सोडचिठ्ठी

New Delhi Assembly Election : निवडणूकीत तिकीट कापल्‍याने होते नाराज

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या ५ दिवस आधी आम आदमी पक्षाच्या ७ आमदारांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये मेहरौली, त्रिलोकपुरी, जनकपुरी, बिजवासन, पालम, आदर्श नगर, कस्तुरबा नगर विधानसभा जागांचा समावेश आहे. या सर्व आमदारांचे पक्षाने दिल्ली निवडणुकीसाठी तिकीट कापले होते. तेव्हापासून हे सर्व आमदार नाराज होते, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याचे समजते.

मेहरौलीचे दोन वेळा आमदार राहिलेले नरेश यादव यांनी शुक्रवारी पक्षाचा राजीनामा दिला. राजीनाम्याचे कारण त्यांनी पक्षात पसरलेला भ्रष्टाचार असल्याचे सांगितले. त्यांनी ‘एक्स’वर पक्ष सोडण्याचे कारणही दिले आहे. ते म्हणाले की, भारतीय राजकारण भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी भ्रष्टाचाराविरुद्ध अण्णांच्या आंदोलनातून 'आप'चा उदय झाला. पण आता आम आदमी पक्ष भ्रष्टाचार कमी करू शकला नाही, उलट 'आप'च भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकली आहे, याचे मला खूप वाईट वाटते. ते म्हणाले की, केवळ प्रामाणिकपणाच्या राजकारणासाठी मी आम आदमी पक्षात सामील झालो होतो. आज प्रामाणिकपणा कुठेच दिसत नाही.

राजीनामा दिलेले ७ आमदार

1. पालमच्या आमदार भावना गौर

2. मेहरौलीचे आमदार नरेश यादव

3. जनकपुरीचे आमदार राजेश ऋषी

4. त्रिलोकपुरीचे आमदार रोहित मेहरौलिया

5. कस्तुरबा नगरचे आमदार मदन लाल

6. बिजवासनचे आमदार भूपेंद्र सिंह जून

7. आदर्श नगरचे आमदार पवन शर्मा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT