Aadhar Update  File Photo
राष्ट्रीय

Aadhaar Update Online | आनंदवार्ता: आधार कार्ड मोफत अपडेटची मुदत वाढली, आता 'या' तारखेपर्यंत करता येणार बदल

नियमांनुसार, प्रत्येक व्यक्तींने त्याचे आधार कार्ड दर १० वर्षांनी अपडेट करणे आवश्यक आहे.

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली : Aadhaar Update Online: आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कागदपत्रे अपलोड करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. आधार कार्ड जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) ही महत्त्वाची माहिती दिली आहे.

UIDAI ने म्हटले आहे की, लाखो आधार कार्ड धारकांसाठी मोफत ऑनलाइन कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा वाढवण्यात येत आहे. आता १४ जून २०२६ पर्यंत नागरिक मोफत कागदपत्रे अपलोड करून आधार कार्डमधील डेमोग्राफिक माहिती अपडेट करू शकतील. म्हणजेच, नागरिकांना यासाठी संपूर्ण एक वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. UIDAI ने हेही स्पष्ट केले आहे की, ते नागरिकांना आधार कार्डमधील कागदपत्रे अपडेट करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. तथापि, मोफत आधार अपडेट करण्यासाठी आता फक्त एकच मार्ग उपलब्ध आहे. तो कोणता हे जाणून घेऊया.

आधार कार्ड मोफत कसे अपडेट करावे?

मोफत आधार अपडेट करण्यासाठी नागरिकांकडे आता एकच मार्ग शिल्लक आहे. UIDAI ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (X) यासंबंधी माहिती दिली आहे. त्यानुसार, मोफत आधार अपडेटची सुविधा फक्त myAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, ऑनलाइन पोर्टलद्वारे डेमोग्राफिक माहिती अपडेट करता येईल, ज्यासाठी पत्त्याचा पुरावा आणि ओळखीचा पुरावा संबंधित कागदपत्रे अपलोड करावी लागतील. अशाप्रकारे, UIDAI ने स्पष्ट केले आहे की, आधारमधील अपडेट पुढील एक वर्षासाठी ऑनलाइन मोफत होईल, परंतु ऑनलाइन अपडेटमध्ये मर्यादित सुविधाच मिळतील.

बायोमेट्रिक अपडेटसाठी काय पद्धत आहे?

जर एखाद्या आधार धारकाला आपले बायोमेट्रिक तपशील अपडेट करायचे असतील, तर त्यांना जवळच्या आधार सेवा केंद्रात जावे लागेल आणि शुल्क भरल्यानंतर हे काम करता येईल. बायोमेट्रिक अपडेट ऑनलाइन करता येणार नाही. तरीही, तुमच्या मनात काही प्रश्न असल्यास, तुम्ही टोल-फ्री क्रमांक १९४७ वर कॉल करून तुमच्या समस्येचे निराकरण करू शकता. याशिवाय, तुम्ही help@uidai.gov.in वर ईमेल लिहून तुमचे प्रश्न विचारू शकता.

आधार दर १० वर्षांनी अपडेट करणे आवश्यक

आजकाल प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी आधार कार्डचा वापर केला जात आहे. कोणतेही सरकारी कागदपत्र बनवायचे असो, बँकेत खाते उघडायचे असो किंवा नवीन नोकरीसाठी कागदपत्रे द्यायची असोत, सर्वत्र आधार कार्ड मागितले जाते. हा १२ अंकी युनिक आयडेंटिटी क्रमांक आहे, ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीची ओळख निश्चित केली जाते. नियमांनुसार, प्रत्येक व्यक्तींने त्याचे आधार कार्ड दर १० वर्षांनी अपडेट करणे आवश्यक आहे. बाल आधार म्हणजेच मुलांचे आधार ५ ते १५ वर्षांच्या दरम्यान अपडेट केले जाते. आधार अपडेटची अंतिम मुदत आज, १४ जून २०२५ रोजी संपत होती. ज्यामध्ये डेमोग्राफिक बदलाची सुविधा पुढील एक वर्षासाठी ऑनलाइन वाढवण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT