पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तर प्रदेशातील आग्रा येथे मिग-२९ हे लष्कराचे लढाऊ विमान आज (दि.४) कोसळले. विमानाने पंजाबमधील आदमपूर येथून उड्डाण केले होते आणि सरावासाठी आग्राला जात असताना ही घटना घडली. न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले जातील, अशी बातमी एएनआयने संरक्षण अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली. बातमी अपडेट होत आहे.
आयएएफचे मिग-२९ आज नियमित प्रशिक्षणादरम्यान आग्राजवळ कोसळले. तांत्रिक बिघाड झाल्यामुळेच ही दुर्घटना घडली. विमान कोसळण्यापूर्वी पायलटने बाहेर उडी मारली, त्यामुळे या विमान दुर्घटनेत कोणत्याही प्रकारे जीवित हानी झालेली नाही. तसेच अपघाताचे कारण शोधण्यासाठी आयएएफने चौकशीचे आदेश देखील दिले आहेत, असे भारतीय हवाई दलाने पोस्ट केले.