संग्रहित छायाचित्र. 
राष्ट्रीय

West Bengal violence | प. बंगालमध्ये TMC नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यात एका स्थानिक तृणमूल काँग्रेस नेत्यावर गोळ्या झाडण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबतची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. अनिमेश रॉय असे त्यांचे नाव आहे. ते सीतालकुची येथील लालबाजारचे पंचायत प्रधान होते. ते गुरुवारी रात्री त्यांच्या एका सहाकाऱ्यासह घरी परतत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.

ज्यांनी गोळीबार केला त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. या हल्ल्यात रॉय यांच्या उजव्या मांडीला गोळी लागली आहे. या गोळीबारात रॉय यांचा सहकारीही जखमी झाला असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणी तपास सुरू असून या हल्ल्यामागे असलेल्यांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

"आम्ही त्याच्या कुटुंबाशीही बोलत आहोत. ते यावर जास्त बोलत नाहीत," असेही त्यांनी म्हटले आहे. रॉय यांच्यावर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT