A 'flying spy'? A seagull with a 'China-made' GPS tracker attached to it was found on Karwar beach, causing a stir
कारवार : पुढारी ऑनलाईन
कर्नाटकच्या कारवार बीचवर GPS डिव्हाइस लावलेला एक सीगल (समुद्री पक्षी) आढळल्याने एकच खळबळ उडाली. जवळच असलेल्या INS कदंबा या नौदल तळामुळे हेरगिरीची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र वन विभाग, पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी स्पष्ट केले की, हा पक्षी श्रीलंकेतील एका वैज्ञानिक स्थलांतर अभ्यास (Migration Study) प्रकल्पाचा भाग आहे. ‘मेड इन चायना’ GPS ट्रॅकरमुळे पसरलेल्या अफवा पूर्णपणे निराधार ठरल्या. GPS डेटानुसार या सीगलने आतापर्यंत 10,000 किलोमीटरहून अधिक अंतर करत पार करत तो कारवारपर्यंत पोहोचला आहे.
बीचवर आढळला थकलेला सीगल
बुधवारी करवार बीचवर स्थानिक नागरिकांना हा पक्षी आढळला. तेंव्हा त्यांना लक्षात आले की, एक सीगल अत्यंत थकलेल्या अवस्थेत आहे आणि त्याच्या शरीरावर एक छोटंसं उपकरण बांधलेलं आहे. पक्ष्याच्या पंखांवर किरकोळ जखमा देखील दिसत होत्या. उपकरण पाहताच लोकांना संशय आला आणि त्यांनी तात्काळ वन विभागाला याची माहिती दिली.
रेस्क्यू आणि तपासानंतर उघडकीस आली खरी गोष्ट
वन विभागाच्या पथकाने सीगलला सुरक्षितपणे रेस्क्यू करून कार्यालयात आणले. तपासादरम्यान हे स्पष्ट झाले की, ते उपकरण कोणताही कॅमेरा किंवा संशयास्पद साधन नसून, वैज्ञानिक संशोधनासाठी वापरण्यात येणारा GPS ट्रॅकर आहे.
श्रीलंकेशी संबंध, चीन फक्त उत्पादक
अधिकाऱ्यांनी श्रीलंकेतील Wildlife and Nature Protection Society (WNPS) या संस्थेशी संपर्क साधला. संस्थेने पुष्टी केली की हा सीगल त्यांच्या दीर्घकालीन स्थलांतर अभ्यास प्रकल्पाचा भाग आहे. GPS ट्रॅकर ‘मेड इन चायना’ असला तरी तो केवळ सामान्य संशोधन उपकरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
10 हजार किलोमीटरहून अधिक उड्डाणाचा प्रवास
GPS डेटनुसार या सीगलने 10,000 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास केला आहे. आर्क्टिक प्रदेशांसह अनेक देश आणि समुद्री मार्ग पार करत तो भारतातील करवार किनाऱ्यावर पोहोचला. ही माहिती वैज्ञानिक अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
पोलीस व गुप्तचर यंत्रणांची तपासणी
माहिती मिळताच पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी घटनास्थळी पाहणी केली. सर्व बाबींची तपासणी केल्यानंतर ही घटना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने पूर्णपणे निरुपद्रवी असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले.