peacock curry recipe Viral Video
पिकॉक करी रेसिपी बनवणे यूट्यूबरला पडले महागात  file photo
राष्ट्रीय

मोराचा रस्सा बनवणे यूट्यूबरला पडले महागात

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : यूट्यूबवर मोराचा रस्सा बनवण्याचा रेसिपी व्हिडिओ शेअर करणे तेलंगणातील राजन्ना सरसिल्ला जिल्ह्यातील एका यूट्यूबरला चांगलेच महागात पडले आहे. 'पारंपरिक पिकॉक करी रेसिपी' (peacock curry recipe) म्हणून यूट्यूबवर व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी तेलंगणातील यूट्यूबर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोडम प्रणय कुमार असे या यूट्यूबरचे नाव असून गुन्हा दाखल होताच तो फरार झाला आहे.

कोडम प्रणय कुमारने यूट्यूबर त्याच्या चॅनलवर मोराचा रस्सा कसा बनवायाचा त्याची रेसिपीचा (peacock curry recipe) व्हिडिओ अपलोड केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यावर नेटकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर पोलिसांनी भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराच्या बेकायदेशीर हत्येला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. प्रणय हा मूळचा सिरसिल्ला जिल्ह्यातील तंगल्लापल्लीचा रहिवासी आहे.

याआधी रानडुकराची करी बनवण्याचा केला होता व्हिडिओ

यूट्यूबर कोडम प्रणय कुमारचा व्हिडिओ सोशल मीडियावरून काढून टाकला असला तरी प्राणी हक्क कार्यकर्ते त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. याआधीही कोडम प्रणय कुमारने त्याच्या यूट्यूब चॅनलवर रानडुकराची करी बनवण्याची रेसिपी दाखवली होती.

मोर पकडल्यास शिक्षा होऊ शकते

राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्याचे एसपी अखिल महाजन यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि अशा कृत्यांमध्ये सामील असलेल्या इतर व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल.' कुमार यालाही रिमांडवर पाठवले जाईल, असे त्यांनी वेगळ्या पोस्टमध्ये म्हटले आहे. पोलीस सध्या कुमारचा शोध घेत आहेत. भारतीय कायद्यानुसार, मोर पाळणे किंवा पकडणे भारतात बेकायदेशीर आहे आणि त्याचे उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा होऊ शकते.

SCROLL FOR NEXT