भंडाराऱ्यात १५ वर्षीय मुलीवर अत्याचार Pudhari File Photo
राष्ट्रीय

भंडाराऱ्यात १५ वर्षीय मुलीवर अत्याचार

पुढारी वृत्तसेवा

बदलापुरामधील शाळकरी मुलींवर झालेल्या घटनेनंतर राज्यभरात अनेक अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहेत. तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करुन रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. अनिल उर्फ सुनील देविदास केवट (वय.२१ रा. पाहूनगाव) असे आरोपीचे नाव आहे.

पिडीत मुलीच्या पालकांकडून तक्रार प्राप्त होताच पवनी पोलिसांनी अत्याचार आणि अ‍ॅट्रासिटी कायद्यांतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. आरोपीला शनिवारी (दि.24) न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. अधिक तपास पवनीचे उपविभागीय पोलिस अधिकारी मनोज सिडाम करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT