छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या वाहन आयईडी स्‍फाेटाने उडवले.  (Image source- X)
राष्ट्रीय

माेठी बातमी| छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा भ्याड हल्ला, ९ जवान शहीद

Chhattisgarh Naxal attacks : सहा जवान गंभीर जखमी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: Chhattisgarh Naxal attacks | छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनावर सोमवारी (दि.६) दुपारी भ्याड हल्ला केला. सुरक्षा दलाच्या वाहनाला आयईडीने लक्ष्य केले. या स्फोटात भारतीय लष्कराच्या ८ जवानांसह एक चालक शहीद झाला आहे. तर ६ हून अधिक जवान गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती बस्तरच्या पोलिस अधिक्षकांनी दिल्याचे वृत्त 'ANI'ने दिले आहे.

नक्षलवाद्यांकडून सुरक्षा दलाचा मोठा 'घातपात'

सोमवारी (दि.६) दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूरचे संयुक्त ऑपरेशन पूर्ण करून परतत असताना विजापूर जिल्ह्यातील कुत्रु-बेद्रे रस्त्यावर नक्षलवाद्यांनी हा घातपात केला. नक्षलवाद्यांनी कुत्रू पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेली गावाजवळ दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी आयईडीचा स्फोट करून सुरक्षा दलाचे वाहन उडवले. यामध्ये ८ दंतेवाडा डीआरजी जवान आणि एक ड्रायव्हर यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

नक्षलीविराेधी माेहिम राबवून परताना केला घात

रविवारी पखंजूरमध्ये सुरक्षा दलाने पाच नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. आज पंखजूर येथून नक्षलविरोधी संयुक्‍त मोहिम राबवून जवान परतत होते. नक्षलवाद्यांनी बिजापूरच्या कुत्रू रोडवर जवानांच्या वाहन आयईडीचा स्फोटने उडवले. दंतेवाडामध्‍ये संयुक्‍त मोहिम राबवून हे जवान छावणीत परत येत होते. यावेळी हा स्‍फोट घडवून आणल्‍याचे बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी दिला आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. अनेक डीआरजी कर्मचारी पिकअपमध्ये होते. असे सांगितले जात आहे की, आयईडी हा सुमारे तीन किलो वजनाचा स्फोटक होता. हा स्‍फोट एवढा भीषण होता की, जवानांच्‍या वाहनाचे तुकडे झाले. सहा जवान गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे मृतांची संख्‍या वाढण्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT