India AI Impact Expo 2026 Pudhari
राष्ट्रीय

India AI Impact Expo 2026: ‘इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो 2026’मध्ये भारतीय स्टार्टअप्सची दमदार हजेरी; एआय नवकल्पनांचा जागतिक ठसा

50 हून अधिक स्टार्टअप्सकडून मीडिया-टेक, गेमिंग आणि व्हर्च्युअल प्रॉडक्शन क्षेत्रात अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाचे सादरीकरण

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो 2026‌’मध्ये ॲनिमेशन, एक्स्टेंडेड रिॲलिटी आणि मीडिया-टेक क्षेत्रातील 50 हून अधिक भारतीय स्टार्टअप्सने कृत्रिम बुद्धिमत्ताआधारित अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे सादरीकरण केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‌‘वेव्हज क्रिएटर्स कॉर्नर‌’ पॅव्हेलियनमध्ये या नवकल्पनांचा विशेष ठसा उमटला.

इमर्सिव्ह स्टोरीटेलिंग ते व्हर्च्युअल प्रॉडक्शनपर्यंत एआयचा विस्तार

या स्टार्टअप्सने इमर्सिव्ह स्टोरीटेलिंग, गेमिंग, व्हर्च्युअल प्रॉडक्शन आणि नेक्स्ट-जेन कंटेंट टेक्नॉलॉजीजसाठी एआयवर आधारित साधने सादर केली. ‌‘झीरो-टच ऑटोनॉमस न्यूज रूम‌’, ‌‘भाषा वॉल‌’ (बहुभाषिक डबिंग व एआय साईन लँग्वेज अवतारसह), ‌‘संवाद सेतू‌’, ‌‘द डायरेक्टर्स‌’ चेअर‌’ यासारख्या इंटरॲक्टिव्ह अनुभवांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. याशिवाय एआय पॉडकास्ट स्टुडिओ, संवाद साधणारे ह्युमनॉईड रोबो आणि व्हॉईस क्लोनिंग तंत्रज्ञानाचेही प्रदर्शन करण्यात आले.

मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील एआय क्रांतीवर चर्चासत्रे

पॅव्हेलियनमध्ये एआयमुळे मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात होत असलेल्या बदलांवर विविध पॅनेल चर्चा, मास्टरक्लास आणि तंत्रज्ञान सादरीकरणांचे आयोजन करण्यात आले आहे. एआयआधारित प्रॉडक्शन वर्कफ्लो, बहुभाषिक व्हॉईस टेक्नॉलॉजी, गेमिंगमधील नवकल्पना, कंटेंट मॉनेटायझेशन आणि जबाबदार एआय फ्रेमवर्क्स यासारख्या विषयांवर सखोल चर्चा झाली. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांचा एआयआधारित स्टोरीटेलिंगवरील मास्टरक्लासही विशेष आकर्षण ठरला.

सोबत सहकार्य; ‌‘कथावतार‌’चे सादरीकरण

मंत्रालयाने अडोबसोबत सहकार्य केले असून, याअंतर्गत कथावतार या विशेष उपक्रमाची घोषणा करण्यात आली. मेड इन इंडिया एआय शॉर्ट फिल्म्सचा हा निवडक संच भारतीय लोककथांवर आधारित आहे. ‌‘लँग्वेज ऑफ बर्ड्‌‍स‌’, ‌‘मिगोई‌’, ‌‘उत्तरायण‌’, ‌‘द बार्बर सिक्रेट‌’ आणि ‌‘यप्पसौरस‌’ या पाच लघुपटांचे प्रदर्शन ‌‘वेव्हज क्रिएटर्स कॉर्नर‌’मधील एआय थिएटरमध्ये संमेलनादरम्यान सतत केले जाणार आहे. अधिकाऱ्यांच्या मते, या उपक्रमातून नव्या पिढीतील भारतीय चित्रपट निर्मात्यांना व्यासपीठ मिळणार असून, एआयच्या साहाय्याने भारतीय कथाकथनाला जागतिकस्तरावर नवी ओळख मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT