पुढारी ऑनलाईन डेस्क: Gujarat accident | गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात खाजगी बस आणि ट्रकचा आज (दि.२१) दुपारी भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून, २३ जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिल्याचे वृत्त 'PTI'ने दिले आहे.
गुजरातमधील कच्छमध्ये शुक्रवारी ४० जणांना घेऊन जाणाऱ्या बसची ट्रकला धडक झाली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. या धडकेत पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केरा मुंद्रा रोडवर हा अपघात झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. भूज कच्छ (पश्चिम) चे पोलिस अधीक्षक म्हणाले की, या अपघातात २३ हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
यापूर्वी १५ फेब्रुवारी रोजी, उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभातील यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या एका पर्यटक व्हॅनची शुक्रवारी रात्री उशिरा एका ट्रकला धडक झाली. गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील महामार्गावर हा अपघात झाला. या अपघातात व्हॅन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले.