354 a ipc sexual harassment charge cannot be applied against women
भारतीय दंड संहितेमध्ये लैंगिक अत्याचाराविरोधात कलम ३५४ अ आहे.  File Photo
राष्ट्रीय

IPC 354 A | महिलेवर लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल होतो का? - उच्च न्यायालयाचा खुलासा

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय दंड संहितेमध्ये लैंगिक अत्याचाराविरोधात कलम ३५४ अ आहे. पण या कलमानुसार महिलेवर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, या प्रश्नाचे उत्तर कलकत्ता उच्च न्यायालयाने दिलेले आहे. (IPC 354 A)

न्यायमूर्ती अजय कुमार गुप्ता यांनी खटल्यात या संदर्भात कायदेशीर तरतुदींचा उहापोह केला आहे. ते म्हणाले, "कलम ३५४अ यामध्ये 'A man committing any of the following acts' असा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे हे कायद्यातील हे कलम महिलांना लागू होऊ शकत नाही. या कलमातील तरतुदी पुरुषासाठी आहेत. हा कायद्याची सुरुवातच A Man या शब्दाने होते." ही बातमी लाईव्ह लॉ या वेबसाईटने दिलेली आहे.

IPC 354 A | कलम ३५४ अ फक्त पुरुषांना लागू

न्यायमूर्ती म्हणाले, "आपण सुरक्षितरीत्या असे म्हणू शकतो की कलम ३५४अ यामध्ये जे शब्द रचना केलेली आहे, त्यानुसार महिलांना हे कलम लागू होणार नाही. हे कलम लिंगाधारित (Gender Specific) आहे, त्यामुळे या कलमाच्यानुसार फक्त पुरुषावरच गुन्हा नोंद होऊ शकतो. त्यामुळे जर एखादी दोषी महिला असेल तर तिला ही कलमं लागू होणार नाहीत."

या कलमातील उपकलम १, २ आणि ३ मध्ये पुरुष असा स्पष्ट उल्लेख असल्याचे न्यायमूर्तींना सांगितले.

या प्रकरणातील याचिककर्ती महिला असून कलम ३५४ अ अंतर्गत तिच्यावर गुन्हा नोंद होऊ शकत नाही, असे तिने म्हटले होते.

SCROLL FOR NEXT