राष्ट्रीय

तब्बल ३३ आमदार तृणमुल काँग्रेसच्या संपर्कात!

Pudhari News

कोलकाता; पुढारी ऑनलाईन : भाजपचे एक दोन नव्हे तर तब्‍बल ३३ आमदार असे आहेत जे पुन्हा सत्‍तेत असलेल्‍या तृणमूल काँग्रेसच्या (TMC) मध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत. निवडणुकीआधी तृणमुलमध्ये असे ३३ आमदार होते, ज्‍यांनी पक्षातून बाहेर पडून भाजपमध्ये सामील झाले होते. यातील तिघांना पक्षाने तिकिट देखील दिले होते. दरम्‍यान आता असा दावा करण्यात येत आहे की, जे भाजपमध्ये गेले आहेत, त्‍यातील ३३ आमदार हे पुन्हा तृणमुलच्या संपर्कात आहेत. या शिवाय भाजपचे राष्‍ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांचे पुत्र सुभ्रांशु हे देखील तृणमुलमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. या सर्व घडामोडींवर भाजप प्रवक्‍ते शमिक भट्टाचार्य ही शुध्द अफवा असल्‍याचे म्‍हटले आहे. 

सुभ्रांशु यांनी एक फेसबुक पोस्‍ट लिहित जनतेने निवडलेल्‍या सरकारवर टीका करण्यापेक्षा आत्‍मपरिक्षण करणे योग्‍य ठरेल अशी टीका केंद्रावर केली होती. त्‍यावर भट्टाचार्य यांनी सुभ्रांशु यांनी रागाच्या भरात ही पोस्‍ट लिहिली होती. सुभ्रांशु रॉय यांनी भाजपने बीजपूरमधून तिकिट दिले होते, मात्र ते जिंकू शकले नाहीत. 

अधिक वाचा :केंद्राकडून राज्यातील २१० कोरोना शहिदांपैकी ५८ जणांना ५० लाख

अशी ही चर्चा आहे की, भाजपमधून पुन्हा तृणमुलमध्ये येण्यास इच्छुक असलेल्‍या आमदारांना घेण्यात तृणमुल घाई करणार नाही. तृणमुल आमदार शुखेंदु शेखर राय यांनी म्‍हटलं आहे की, शनिवारी दुपारी ३ वाजता पक्षाच्या कार्यालयामध्ये आमची बैठक आहे. यावेळी या मुद्द्यावर देखील चर्चा होऊ शकते. 

पुढे बोलताना त्‍यांनी सांगितले की, आता पुन्हा कोणालाही पक्षात घेण्याआधी अनेक प्रश्नांची उत्‍तरे तपासून पाहिली जातील. ते पक्ष सोडून पुन्हा का येत आहेत. हे देखील पाहतील की, ही भाजपची काही रणनीती नाही ना? या सर्व प्रश्नांची उत्‍तरे मिळाल्‍यावर त्‍या आमदाराला पक्षात घ्‍यायचे की नाही याविषयी पक्ष निर्णय घेईल. या आमदारांची नावे अजूनही समोर आलेली नाहीत. हे घर वापसीचे वारे जर असेच राहिले तर मात्र बंगाल मधून भाजपचा पत्‍ता साफ होउ शकतो.  

अधिक वाचा :पीएम मोदींची लसीसाठी फोनाफोनी! कमला हॅरिस यांच्याशी केली 'लस की बात'

सरला मुर्मु, माजी आमदार सोनाली गुहा आणि फुटबॉलर ते राजनेता बनलेले दीपेंदू विश्वास यांनी हे स्‍पष्‍ट केले आहे की, ते पुन्हा तृणमुलमध्ये सामिल होण्यासाठी इच्छुक आहेत. सरला मुर्मु यांना तृणमुलने हबीबपुर येथून तिकिट दिले होते. तरीही त्‍यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. आता पुन्हा त्‍यांना तृणमुल मध्ये यायचे आहे.  

अशाच प्रकारे माजी आमदार सोनाली गुहाही घरवापसीच्या प्रतिक्षेत आहेत. त्‍यांनी ममता यांना पत्र लिहून सांगितले आहे की, ज्‍या प्रकारे मासा पाणी सोडून बाहेर राहू शकत नाही, त्‍या प्रकारे मी तुम्‍हाला सोडून राहू शकत नाही दीदी. फुटबॉलर ते राजनेता बनलेले दीपेंदु विश्वास यांनी ममता दीदींना पत्र लिहून तृणमुल मध्ये सामिल होण्याची इच्छा व्यक्‍त केली आहे. 

SCROLL FOR NEXT