30 मुस्लिमांनी इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्मात प्रवेश केला Pudhari File Photo
राष्ट्रीय

मध्य प्रदेशात 30 मुस्लिमांनी स्वेच्छेने स्वीकारला हिंदू धर्म

पुढारी वृत्तसेवा

भोपाळ : मध्य प्रदेशातील 30 मुस्लिमांनी इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्मात प्रवेश केला. इंदौरमधील प्रसिद्ध मंदिरात धर्मांतराचा विधी पार पडला. धर्मांतर केलेल्यांनी कायदेशीर प्रक्रिया पार पाडून हिंदू धर्मात प्रवेश केल्याची माहिती सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष सॅम पावरी यांनी दिली.

इंदौर आणि पश्चिम मध्य प्रदेशातील 30 मुस्लिमांनी स्वेच्छेने हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. यामध्ये 14 महिलांचा समावेश आहे. मध्य प्रदेशातील धार्मिक स्वतंत्रता अधिनियमानुसार मुस्लिमांनी धर्मांतर केले आहे. बळजबरीने कुणाचेही धर्मांतर करण्यात आले नसल्याचेही पावरी यांनी सांगितले. दरम्यान, आमचे पूर्वज हिंदू असल्यामुळे आम्ही स्वधर्मात प्रवेश केल्याचे धर्मांतर केलेल्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT