राष्ट्रीय

PM Awas Yojana Budget 2024 | पीएम आवास योजनेंतर्गत ३ कोटी नवी घरे

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज (दि.२२ जुलै) संसदेत मांडण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतामारामन यांनी मोदी सरकार काळातील आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सलग सातवा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरी भागासाठी ३ कोटी नवी घरे बांधण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, असे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले.

पंतप्रधान आवास योजनेबाबत मोठी घोषणा

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तीन कोटी अतिरिक्त घरे बांधण्यात येणार आहेत. ही घरे शहरे आणि ग्रामीण भागात बांधली जाणार आहेत. पीएम आवास योजनेअंतर्गत १ कोटी शहरी गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबांच्या शहरी घरांच्या गरजा पूर्ण केल्या जाणार. यासाठी 10 लाख कोटींच्या तरतूदीची घोषणा सीतारामन यांनी केली.

SCROLL FOR NEXT