पुढारी ऑनलाईन डेस्क : Manipur Accident : मणिपूरच्या सेनापती जिल्ह्यातील चांगौबंग गावात भारतीय लष्कराचा एक ट्रक दरीत कोसळून मोठा अपघात घडला. या दुर्घटनेत तीन बीएसएफ जवान शहीद झाले, तर 13 जवान जखमी झाले.
लष्कराच्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, BSF च्या दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला, तर एका जवानाने रुग्णालयात नेत असताना अखेरचा श्वास घेतला. मृत जवानांचे शव सेनापती जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. जखमी जवानांपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
आठ जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाला तातडीच्या उपचारासाठी इंफाळला हलवण्यात आले आहे. तर एकाला सेनापतीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित जखमींवरही उपचार सुरू आहेत.