रायपूर : पुढारी वृत्तसेवा
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात एका नक्षल दाम्पत्यासह एकूण २२ नक्षल्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे समोर आले आहे. शासनाच्या नक्षल सदस्य मुक्त ग्राम पंचायत अंतर्गत २२ नक्षल्यांना आत्मसमर्पण करविण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.
नक्षल सदस्य मुक्त ग्राम पंचायतला १ कोटी रुपये प्रोत्साहन बक्षीस देण्याची योजना
आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांवर एकूण ४० लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले होते. आत्मसमर्पित १ पुरूष व १ महिला नक्सलीवर ८-८ लाख, १ पुरूष व १ महिला नक्सलीवर ५-५ लाख, २ पुरूष व ५ महिला २-२ लाख, १ पुरूष नक्सल वर ५० हजार असे एकूण ४० लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस घोषित होते.
नक्षल्यांना आत्मससमर्पणासाठी डीआरजी सुकमा, रेंज फिल्ड टीम (आरएफटी) कोंटा, सुकमा, जददलपूर सीआरपीएफ व कोबरा यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आत्मसमर्पित नक्षल्यांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल होते.