भारताचे पररराष्ट्रमंत्री एस. जयशंकर File Photo
राष्ट्रीय

अमेरिकेतील 20 हजार स्थलांतरित भारतीयांना मायदेशी आणणार : जयशंकर

डोनाल्ड ट्रम्प यांनी विदेशी नागरिकांची हकालपट्टी करण्याचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : अमेरिकेत स्थलांतर केलेल्या 20 हजार भारतीयांना मायदेशी आणणार असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत बेकायदा आश्रय घेतलेल्या विदेशी नागरिकांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. बेकायदा वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे प्रर्त्यापणही सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील बेकायदा वास्तव्यास असलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणणार असल्याची माहिती जयशंकर यांनी दिली. अमेरिकेत साधारण 20 हजारांवर भारतीय बेकायदा राहत असल्याचे सांगण्यात येते. अमेरिकन प्रशासनाकडून कागदपत्राची पूर्तता केल्यावर आम्ही कायदेशीरमार्गाने भारतीयांना परत आणणार असल्याचे जयशंकर यांनी सांगितले. अमेरिका आणि भारतामध्ये व्हिसासंदर्भात करार झाल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीयांच्या एच-1 बी व्हिसावर निर्बंध नाही : ट्रम्प

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी एच-1 बी व्हिसासंदर्भात भारतीयांना दिलासा दिला. अमेरिकेला गुणवंत आणि प्रतिभावंत मनुष्यबळाची गरज असल्याने एच-1 बी व्हिसावर निर्बंध घातले जाणार नसल्याची ग्वाही ट्रम्प यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT