आजपासून १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन  file photo
राष्ट्रीय

Lok Sabha Session 2024 Live Updates : लोकसभेचे अधिवेशन सुरू; PM मोदींनी घेतली खासदार म्हणून शपथ

मोहन कारंडे

राज्यघटनेला कोणतीही शक्ती हात लावू शकत नाही : राहुल गांधी

भारताच्या राज्यघटनेला कोणतीही शक्ती हात लावू शकत नाही, आम्ही तिचे रक्षण करू, असे संसदेच्या आवारात विरोधकांच्या निदर्शनानंतर राहुल गांधी म्हणाले.

मोदींनी संविधान तोडण्याचा प्रयत्न केला : मल्लिकार्जुन खर्गे

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, "आम्ही संविधान वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नात जनता आमच्यासोबत आहे, पण पंतप्रधान मोदींनी संविधान तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच आज आम्ही एकत्र येऊन आंदोलन करत आहोत. लोकशाहीचा प्रत्येक नियम मोडला जात आहे, म्हणून आज आम्ही मोदींना संविधानाचे पालन करण्यास सांगत आहोत."

इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून संविधानाची प्रत घेऊन निषेध

इंडिया आघाडीच्या नेत्यांनी संविधानाची प्रत घेऊन संसदेच्या आवारात निदर्शने केली. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले की, "संविधानातील तरतुदींचा भंग झाल्यामुळे आम्ही आंदोलन करत आहोत. नरेंद्र मोदी सरकारने संविधानाचे उल्लंघन केले आहे. ज्या प्रकारे प्रोटेम स्पीकरची नियुक्ती करण्यात आली आहे, ते घटनेच्या तरतुदींच्या विरोधात आहे.

२७ जूनला राष्ट्रपती दोन्ही सभागृहांना करणार संबोधित

२७ जून रोजी राष्ट्रपती मुर्मू संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चा २८ जून रोजी सुरू होईल. पंतप्रधान मोदी २ किंवा ३ जुलैच्या सुमारास संबोधित करतील.

पंतप्रधान मोदींनी संसद सदस्य म्हणून घेतली शपथ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद सदस्य म्हणून शपथ घेतली. त्यांच्यानंतर अमित शहा, राजनाथ सिंह यांनीही खासदार म्हणून शपथ घेतली आहे.

हंगामी अध्यक्षांनी राहुल गांंधींचा राजीनामा स्वीकारला

हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा राजीनामा स्वीकारला. रायबरेली लोकसभेची जागा राहुल गांधींनी राखली आहे.

निवडणूक भव्य आणि गौरवशाली पद्धतीने पार पडली : मोदी

अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, " जगातील सर्वात मोठी निवडणूक अतिशय भव्य आणि गौरवशाली पद्धतीने पार पडली. ही निवडणूक खूप महत्त्वाची बनली होती. स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदा देशातील जनतेने एका सरकारला सलग तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली आहे.

अधिवेशनापूर्वी पंतप्रधान मोदींचा माध्यमांशी संवाद 

आजपासून १८ व्या लोकसभेला सुरुवात होत आहे. जगातील सर्वात मोठी निवडणूक अतिशय भव्य आणि दिमाखदार पद्धतीने पार पडली. ही निवडणूकही खूप महत्त्वाची ठरली कारण स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदा लोकसभेत देशाने एका सरकारला सलग तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली असल्‍याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. आम्‍ही यापुढेही पहिल्‍यापेक्षा तीनपट अधिक मेहनत करणार असल्‍याचेही त्‍यांनी म्‍हंटलं, संसदीय अधिवेशनाआधी संसद भवन परिसरातून नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले.

राष्ट्रपतींकडून लोकसभेच्या हंगामी अध्यक्षांना शपथ

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भर्तृहरी महताब यांची नियुक्ती लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी केली आहे. राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांना प्रोटेम स्पीकर म्हणून शपथ दिली. लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंह निवडून आलेल्या सदस्यांची यादी सभागृहात सादर केली.

संसदेचे अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. १८ व्या लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनात रालोआ सरकारची कसोटी लागणार आहे. लोकसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून विरोधक सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहेत; तर या माध्यमातूनच आपली ताकद दाखवण्याचा रालोआचा प्रयत्न असणार आहे. याशिवाय अनेक विषयांवर विरोधी पक्ष व सत्ताधाऱ्यांत खडाजंगी पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत. हे अधिवेशन ३ जुलैपर्यंत चालणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT