Chhattisgarh naxal surrender
छत्तीसगड : 'नियाद नेल्लनार' योजनेमुळे प्रभावित होऊन आज १८ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यापैकी ४ नक्षलवादी बटालियन क्रमांक १ शी संबंधित आहेत, असे सुकमाचे पोलिस अधिक्षक किरण चव्हाण यांनी सांगितले.
दक्षिण बस्तरमध्ये सक्रिय नक्षलवाद्यांनीही आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण केलेल्यांना राज्य सरकारच्या सुरू असलेल्या सर्व योजनांचे लाभ मिळतील. सर्व नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले.