नवी दिल्ली : लिंगायत समाजाच्या १७ उपजाती केंद्राच्या ओबीसी यादीमध्ये समाविष्ट होणार असल्याची माहिती शिवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी बुधवारी (दि. १८) दिली. यासंबंधी त्यांची केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासोबत बैठक झाली.
बैठकीनंतर बोलताना ते म्हणाले की, ‘आज केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासोबत बैठक झाली. शिवा संघटनेमुळे लिंगायत समाजाच्या २५ जाती ओबीसीमध्ये आल्या आहेत. आता १७ उपजाती केंद्राच्या ओबीसी यादीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबतीत आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. तसेच राष्ट्रीय ओबीसी आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतली. लवकरच १७ उपजाती ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्राला प्रस्ताव देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
‘यासाठीच्या तांत्रिक बाबींची माहिती राज्याकडून मागवली आहे. या १७ उपजाती महाराष्ट्रातील असून मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त आहेत, असे ते म्हणाले. या उपजाती ओबीसीमध्ये समाविष्ट झाल्यावर मोठा फायदा होणार आहे. आम्ही सुरुवातीपासून ओबीसीमध्ये जाण्यासाठी आग्रही आहोत असे ते म्हणाले.
१. लिंगायत वाणी
२. लिंगायत तांबोळी
३. लिंगायत गुरव
४. लिंगायत जंगम
५. लिंगायत कुंभार
६. लिंगायत न्हावी
७. लिंगायत परीट
८. लिंगायत धोबी
९. लिंगायत फुलारी
११. लिंगायत सुतार
११. लिंगायत कुंभार
१२. लिंगायत कानडी
१३. लिंगायत पंचम
१४. माला जंगम (वीरभद्र)
१५. लिंगायत कोस्ती
१६. लिंगायत देवांग
१७. लिंगायत साळी