Fraud News
योजनेची रक्कम मिळताच महिला प्रियकराबरोबर पळून गेल्या File Photo
राष्ट्रीय

ऐकावं ते नवलंच! 'या' योजनेची रक्कम हातात पडताच ११ महिला प्रियकरासोबत पळाल्या

पुढारी वृत्तसेवा

लखनौ : पीएम आवास योजनेचा पहिला हप्ता मिळताच उत्तर प्रदेशातील तब्बल 11 महिलांनी नवरा आणि मुलांना सोडून प्रियकरासोबत पळ काढला आहे. विशेष म्हणजे या सगळ्या महिला वेगवेगळ्या गावांतील आहेत. मराजगंज जिल्ह्यातील निचलौल ब्लॉकमधील या महिलांना 40 हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळताच त्या प्रियकरासोबत फरारी झाल्यामुळे खळबळ माजली आहे. त्यामुळे यातील प्रत्येकीच्या नवर्‍याने फिर्याद नोंदवली आहे.

पीएम किसान योजनेसाठी 108 गावांतील 2350 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. यापैकी दोन हजारांहून अधिक लाभार्थ्यांची घरे बांधून पूर्ण झाली आहेत. महिला पळून गेल्याची घटना उजेडात आल्यानंतर पीएम आवास योजनेतील पुढचा हप्ता थांबवण्यात आला आहे. तसेच या महिलांकडून पहिल्या हप्त्यातील रक्कम वसूल करण्यासाठी प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे.

SCROLL FOR NEXT