अयोध्या : प्राणप्रतिष्ठेपूर्वी होणार्या अनुष्ठानांसाठी बडोद्याहून अयोध्येत दाखल झालेली 108 फुटांची धूप अगरबत्ती चेतविण्यात आली असून, तिचा सुगंध अयोध्येत दीड महिना दरवळणार आहे. या अगरबत्तीत देशी गायीचे शेण, तुपाचा वापर करण्यात आला आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाळ दास यांच्या मुख्य उपस्थितीत ही अगरबत्ती चेतविण्यात आली.
108 फूट लांबी
3 फूट रुंदी
3610 किलो वजन
6 महिन्यांत तयार
100 वर प्रकारच्या
जडीबुटींचा वापर
90 दिवसांवर
अखंड प्रज्वलन
50 कि.मी.पर्यंत
सुगंध दरवळणार