स्वातंत्र्यदिनी १०३७ जणांना मिळणार शौर्य आणि सेवा पदक file photo
राष्ट्रीय

स्वातंत्र्यदिनी १०३७ जणांना मिळणार शौर्य आणि सेवा पदक

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदा देश गुरुवारी ७८ वा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2024) साजरा करत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी बुधवारी सरकारने राष्ट्रपती पदक जाहीर केले आहे. पोलीस, अग्निशमन, होमगार्ड, नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवांमधील एकूण १०३७ जवानांना यावर्षी शौर्य आणि सेवा पदक प्रदान करण्यात येणार आहेत.

सरकार दरवर्षी जीवन आणि मालमत्ता वाचवण्यासाठी किंवा गुन्हेगारी रोखण्यासाठी किंवा गुन्हेगारांना अटक करण्याच्या अतुलनीय शौर्याच्या कृतीच्या आधारावर राष्ट्रपती पदक आणि शौर्य पदक प्रदान करते. आज गृह मंत्रालयाने पदक मिळविणाऱ्यांची नावे जाहीर केली. उत्तर प्रदेशातून एडीजी सुवेंद्र कुमार भागल, डीआयजी कल्पना सक्सेना, इन्स्पेक्टर सुगंधा उपाध्याय आणि एसआय रामवीर सिंग यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानीत करण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT