नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देवेंद्र फडणवीसांकडून अटकेबाबत केवळ कांगावा केला जात आहे. वाघाच्या जबड्यात हात घालणारे आहोत, असे महणणारे देवेंद्र फडणवीस अटकेला का घाबरत होते? असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. नाशिक पवित्र जागा आहे. इकडे सगळी पाप रामकुंडामध्ये बुडवली जातात. भाजपलाही इथेच बुडवू, असा इशाराही राऊत यांनी दिला.
खासदार राऊत हे नाशिक दौऱ्यावर आले असता माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीवर आरोप करत नाशिकमध्ये भाजपने काहीही केले तरी शिवसेनेचा भगवाच फडकणार, असा विश्वास व्यक्त केला. बाळासाहेब ठाकरे यांचे नाशिकवर अत्यंत प्रेम होते. मात्र, गिरीश महाजन यांच्यासारख्या लोकांनी नाशिकच्या केलेल्या स्थितीबद्दल नाशिककरांमध्ये संताप आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचे पहिले महाअधिवेशन झाले होते. नाशिकसारख्या पवित्र ठिकाणी हल्ली टोकन देऊन प्रवेश करून घेण्याचे प्रकार होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. रेट कार्डनुसार प्रवेश होत आहेत. सुरुवातीला ऑर्डर दिली जाते. काही लोकांना टोकन देऊन ठेवायचे मग माझ्या दौऱ्याचा मुहूर्त पाहून प्रवेश करायचा, असे उद्योग सुरू असल्याचे खा. राऊत यांनी सांगितले.
अमित शहा यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद लाभणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या तत्कालीन राज्यपालांना त्यांनी शेवटपर्यंत अभय देत त्यांचे समर्थन केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना मानणारा या महाराष्ट्रातला समाज त्यांना पाठिंबा देईल, असे वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज असल्याचे राऊतांनी नमूद केले.
हेही वाचा :