पंचवटी, नाशिक : पुढारी वृत्तसेवा : येथील पोलिस ठाण्यातील हवालदार अनिल तानाजी जमधाडे (५0) यांनी गुरुवारी (दि.२४) दुपारी ओढा रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याची घटना घडली. दिंडोरी तालुक्यातील मातेरेवाडी हे जमधाडे यांचे मूळ गाव असून, सध्या ते पंचवटीतील रासबिहारी लिंक रोडवरील मानेनगर परिसरात वास्तव्यास होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसून, याप्रकरणी आडगांव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जमदाडे हे १९९१ मध्ये पोलिस सेवेत रुजू झाले होते. मनमिळावू स्वभावाच्या जमदाडे यांच्या निधनामुळे पोलिस वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.