Latest

नाशिक : सैन्यदल अधिकारी पूर्व प्रशिक्षणासाठी येत्या बुधवारी मुलाखती

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी 29 मे ते 7 जून या कालावधीत एसएसबी (SSB) कोर्स क्रमांक 53 चे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी बुधवार, दि. 24 मे रोजी जिल्हा सैनिक कार्यालय नाशिक येथे उपस्थित राहावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट (निवृत्त) ओंकार कापले यांनी कळविले आहे.

केंद्रामध्ये एसएसबी कोर्स प्रवेशासाठी उमेदवार हा कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास असावा व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेला असावा. उमेदवार एनसीसी 'सी' सर्टिफिकेट 'ए' किंवा 'बी' ग्रेडमध्ये पास असावा. एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केली असावी. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. युनिव्हर्सिटी एन्ट्री स्कीमसाठी एसएसबी कॉल लेटर किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. मुलाखतीसाठी येताना उमेवाराने फेसबुक पेजवर (Department of Sainik Welfare, Pune (DSW)वर सर्च करून त्यामधील SSB-53 कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व पूर्ण भरून सोबत आणावी. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिकरोड यांचा ई-मेल pctcoic@yahoo.in अथवा कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधावा, असेही कापले यांनी कळविले आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT