नाशिक : जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी रविवारी (दि. ५) मतदान झाले. निवडणुकीत तब्बल ९० टक्के मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावताना उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद केले. आज सोमवारी (दि. ६) तहसील कार्यालयांमध्ये मतमोजणी पार पडत असून, दहा वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तसेच निकाल हाती येऊ लागले आहेत.
कळवण तालुका : पाच ग्रामपंचायतींचे निकाल हाती
ग्रामपंचायत कोसवन, सरपंच -संदीप भोये
ग्रामपंचायत खडकी, सरपंच- उत्तम भोये
ग्रामपंचायत देसगाव, सरपंच- जिजाबाई बागुल
ग्रामपंचायत करंभेळ क, सरपंच- शुभम गावित
ग्रामपंचायत सरले दिगर , सरपंच -सुंतीलाल बागुल
देवळा तालुका ; माळवाडी ग्रामपंचायत निकाल
तात्याभाऊ भदाणे 305(विजयी)
अलकाबाई पवार 284+284+278 (846,विजयी)
गायत्री अहिरे 202 (विजयी)
फुले माळवाडी ग्रामपंचायत
कल्पना बच्छाव 302 (विजयी)
लंकेश बागुल 333+446+248(1027 विजयी)
देवळा तालुक्यातील मेशी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदी शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख बापू शांताराम जाधव यांना 1139 मते मिळून ते विजयी झाले आहेत.
नाशिकमध्ये मनसेने खाते खोलले आहे. जव्हाळे ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे.
येथील सुभाषनगर ग्रामपंचायतीवर अपक्षांचा झेंडा फडकला आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.