Latest

नाशिक गुन्हेगारी : महिलेचा पाठलाग करीत विनयभंग

अंजली राऊत

नाशिक : महिलेचा पाठलाग करीत तिचा विनयभंग केल्या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात संशयित विकास बाळासाहेब आनंदराव (३५, रा. गणेशवाडी, पंचवटी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित विकासने मंगळवारी (दि. २५) रात्री ८ ला तपोवन येथील बस डेपोजवळ पाठलाग करून विनयभंग केला. या प्रकरणी आडगाव पोलिस अधिक तपास करीत आहेत.

कुरापत काढून मारहाण

नाशिक : मागील भांडणाची कुरापत काढून एकाने तरुणाला मारहाण केल्याची घटना संत कबीरनगर परिसरात घडली. वैभव विनायक बोराडे (२७, रा. कॉलेजरोड) याच्या फिर्यादीनुसार, संशयित गांग्या उर्फ राहुल पोपट शिंदे (४०, रा. संत कबीरनगर) याच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. गांग्याने मंगळवारी (दि. २५) रात्री ९ ला कुरापत काढून दोन भावांना शिवीगाळ करीत वैभवला मारहाण करीत दुखापत केली. या प्रकरणी गंगापूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

घरातील 23 लाखांची रोकड लंपास

नाशिक : घरात शिरून चोरट्याने २३ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना महात्मानगर परिसरात घडली. मंजुश्री समीर राठी (रा. महात्मानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याने दि. १३ मार्च ते १३ एप्रिल दरम्यान, घरात शिरून रोकड चाेरून नेली. या प्रकरणी गंगापूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

युवकाचा मोबाइल हिसकावला

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतून दुचाकीस्वार चोरट्याने युवकाचा मोबाइल हिसकावून पळ काढल्याची घटना १० मार्चला घडली होती. या प्रकरणी कार्तिक राजेंद्र कानडे (१८, रा. एम.एस.ई.बी. कॉलनी, सातपूर) याने सातपूर पोलिस ठाण्यात जबरी चोरीची फिर्याद दाखल केली आहे. चोरट्याने कार्तिककडील १२ हजार ५०० रुपयांचा मोबाइल दमदाटी करीत हिसकावून नेला. या प्रकरणी सातपूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

जेलरोड अपघातात महिला ठार

नाशिक : जेलरोड परिसरात अपघातात महिला ठार झाल्याची घटना मंगळवारी (दि. २५) घडली. करुणा अशोक जोगदंड (रा. कॅनॉल रोड, जेलरोड) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. सोनाली यांना एमएच १५ एफडब्ल्यू १४७४ क्रमांकाच्या दुचाकीने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वृद्धेची पोत खेचली

नाशिक : नाशिकराेड येथील खोले मळा परिसरात दुचाकीस्वार चाेरट्याने वृद्धेची पोत खेचून नेली. शोभा राजेंद्र चुडीवाल (६८, रा. खोले मळा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरट्यांनी बुधवारी (दि. २६) सकाळी शोभा यांच्या गळ्यातील ९० हजार रुपयांची तीन तोळे वजनाचे सोन्याची पोत खेचून नेली. या प्रकरणी उपनगर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

कोयता बाळगणारा गजाआड

नाशिक : शरणपूर रोडवरील राका गार्डनसमोर कोयता घेऊन फिरणाऱ्या संशयिताला सरकारवाडा पोलिसांनी पकडले. दीपक सुनील घाटोळे (१९, रा. संत कबीरनगर) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. तो बुधवारी (दि. २६) सायंकाळी ६ च्या सुमारास कोयता घेऊन फिरताना आढळला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT