नाशिक : मानुर गाव परिसरातील मौनगिरी बाबा आश्रमाजवळ एकाने सागर रमेश कदम (३१, रा. नांदुरगाव) यास मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. सागर यांच्या फिर्यादीनुसार, संशयित संजू चाटोळे (रा. देवळाली गाव) याने मागील भांडणाची कुरापत काढून हत्याराने मारहाण करीत दुखापत केली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात संजू विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुगाऱ्यांवर कारवाई
नाशिक : गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने शरणपूर गावठाण परिसरात कारवाई करीत तिघा संशयित जुगाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे. पोलिस नाइक प्रशांत मरकड यांच्या फिर्यादीनुसार, संशयित सचीन काळे (३१, रा. पंचवटी), माधव गवळी (३६, रा. त्र्यंबकरोड) व प्रकाश पाल (६०, रा. शरणपूर रोड) हे तिघे बुधवारी (दि.३०) दुपारी जुगार खेळताना व खेळवताना आढळून आले. त्यांच्याकडून पोलिसांनी जुगाराचे साहित्य व रोकड जप्त केली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस तपास करीत आहेत.
चॉपरसह दोघे ताब्यात
नाशिक : चॉपर घेऊन फिरणाऱ्या दोघा संशयितांना सातपूर पोलिसांनी पकडले आहे. संशयित आकाश सुरेश जगताप (२४) व समाधान तुळशीराम पालखी (३०, दोघे रा. श्रमिकनगर) यांना सातपूर पोलिसांनी बुधवारी (दि.३०) मध्यरात्री कार्बन कंपनीजवळील परिसरातून पकडले. त्यांच्याविरोधात सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :