नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा
येथील किराणा व्यावसायिकाच्या घरात भरदिवसा डोअर बेल वाजवून प्रवेश करत चार दरोडेखोरांनी कोयता आणि चॉपरचा धाक दाखवून दरोडा टाकला. यामध्ये तीन तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण तीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरला आहे.
सातपूर कॉलनी पपया नर्सरी मागील साईरत्न अपार्टमेंट मध्ये दुसऱ्या मजल्यावर फ्लॅट क्र. ६ मध्ये राहणाऱ्या संजय त्रिवेदी हे किराणा व्यावसायिक आहेत. बुधवारी (दि.19) ते दुकानात गेले होते. त्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास घरी पत्नी व मुलगी या घरात होत्या. दरवाजाची डोअर बेल वाजल्याने त्यांनी दरवाजा उघडला असता चार दरोडेखोर हातात कोयता व चॉपरचा धाक दाखवून त्यांनी घरात प्रवेश केला. मुलींच्या गळ्यावर चॉपर ठेवत आईला धमकावून दोन तोळ्यांचे मंगळसूत्र व एक तोळ्यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेत दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. दरम्यान एक दरोडेखोर इमारतीखाली पल्सर दुचाकीवर स्वार होता. सातपूर कॉलनी ८ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजता नागरगोजे यांच्या भगवानगड या बंगल्यावर व त्यानंतर सात आठ ठिकाणी अशाच सशस्त्र दरोडा पडला होता. या बाबतीत तपास शून्य असताना सातपूर कॉलनीत भरदुपारी पाच दरोडेखोर येत दरोडा टाकत दहशत निर्माण करुन आरामात पोबार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे येथील परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिक करत आहेत. दरम्यान घटनास्थळी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, गुन्हे पोलीस निरीक्षक आनंद वाघ, सहायक आयुक्त मोरे यांनी पाहणी केली. सातपूर वरीष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा:
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.