पुढारी ऑनलाईन: भारतीय जनता पक्ष (भाजप) नेतृत्वाखालील केंद्र सरकारने नऊ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केले आहे. पीएम मोदी यांनी सोमवारी (दि.३०) केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज आम्ही देशाच्या सेवेत ९ वर्षे पूर्ण करत आहोत. या काळात मी नम्रता आणि कृतज्ञतेने ओतप्रोत झालो आहे. आमच्या सरकारचे प्रत्येक निर्णय आणि कृती देशातील लोकांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशानेच आहे. यापुढे देखील विकसित भारताच्या उभारणीसाठी आम्ही (Narendra Modi BJP) आणखी कठोर परिश्रम करत राहू, असे पीएम मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आज भाजप सरकारला ९ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त भाजपने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडेलवरून ट्विट केले आहे. यामध्ये पीएम मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील ९ वर्षे सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी असल्याचे म्हटले आहे. गेल्या 9 वर्षात देशाच्या सक्षम नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप सरकारने 'राष्ट्र प्रथम' या भावनेने देशवासीयांच्या आशा, आकांक्षा पूर्ण केल्या आहेत, असे देखील भाजप पक्षाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.