File Photo 
Latest

Narcotic Found in Nagpur : प्रवाशाच्या बॅगेत सापडले तब्बल २४ कोटींचे अंमली पदार्थ; नागपूर विमानतळावर डीआरआयची कारवाई

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तेसावा : डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयाने व्यापार प्रतिबंधित 'ॲम्फेटामाइन' प्रकारचे 24 कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे 3.07 किलो अंमली पदार्थ नागपूर विमानतळावरून जप्त करण्यात आले.

नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) अधिकाऱ्यांनी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर  20 ऑगस्ट रोजी केनियातल्या नैरोबी येथून शारजाह युएईमार्गे आलेल्या एका भारतीय नागरिकाला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून 3.07 किलो 'ॲम्फेटामाइन प्रकारचा पदार्थ' जप्त केला. हा प्रवासी शारजाहून एअर अरेबिया फ्लाइट क्रमांक G9-415 ने नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. त्याने त्याच्या सामानात आयताकृती पुठ्ठयाच्या खोक्यातील वेष्टित पोकळ धातूचा रोलर ठेवलेला होता. यामध्ये हा प्रतिबंधित पदार्थ लपवलेला होता.

संबंधित प्रकरणातील व्यक्तीला अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, नागपूर यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला डीआरआय कोठडी सुनावली. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची अधिक चौकशी घेण्यात आली. यावेळी त्याने दिलेल्या माहितीनुसार तो, नायजेरियन नागरिकाला हा प्रतिबंधित पदार्थ विकला जाणार होता. यानंतर संबंधित नायजेरियन नागरिकाला प्रतिबंधित पदार्थ पुरवला जाणार होता. या नागरिकाला देखील अधिकाऱ्यांनी पश्चिम दिल्लीच्या सुभाषनगर परिसरातून सोमवारी (दि. 21) अटक केली.

ॲम्फेटामाइन या पदार्थाच्या व्यापारावर बंदी

ॲम्फेटामाइन हे अंमली औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा, 1985 च्या अनुसूची अंतर्गत समाविष्ट असलेला एक सायकोट्रॉपिक(व्यक्तीच्या मनावर परिणाम करणारा) पदार्थ आहे. याचा  व्यापार प्रतिबंधित आहे.

नागपुरात अंमली पदार्थ, सोने तस्करीचे प्रमाण वाढले

नागपुरात गेल्या काही दिवसात अंमली पदार्थ, सोने तस्करीचे प्रमाण वाढले आहे. अनेकजण एअर अरेबियाच्या विमानाने नागपुरात आल्यानंतर या साहित्याची खेप मध्य भारतात इतरत्र रवाना करतात असे दिसून आले आहे. नागपूरसारख्या छोट्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात ॲम्फेटामाइन हा अंमली पदार्थ सापडणे म्हणजेच या व्यवसायात गुंतलेल्या सिंडिकेट मार्फत नवनवीन पद्धती आणि ठिकाणांवर लक्ष केंद्रित असल्याचे हे द्योतक असून डीआरआय देखील अशा व्यक्तींवर नजर ठेवून असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT