Latest

कर्नाटकात नंदिनी दूध दरात आजपासून वाढ

दिनेश चोरगे

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  कर्नाटक सहकारी दूध उत्पादक महामंडळाने (केएमएफ) नंदिनी दूध दरवाढीचा निर्णय घेतला आहे. प्रति लिटर तीन रुपयाने वाढ केली असून याचा फटका राज्यभरातील ग्राहकांना बसणार आहे. नवीन दरवाढ मंगळवार 1 ऑगस्टपासून लागू होणार आहे. नवीन दरामुळे ब्लू दुधाचा दर प्रति लिटर 39 ते 42 रु. इतका होणार आहे. तर ब्लू (टोन्ड) दूध 40 ते 43 रु., ग्रीन दूध 44 ते 47 रु., ऑरेंंज दूध 45 ते 48 रु., दही प्रति किलो 47 ते 50 रु., दही (अर्धा किलो) 24 ते 26 रु. दर होणार आहे.

दरवाढीबाबत माहिती देताना केएमएफचे कार्यकारी संचालक जगदीश म्हणाले, सरकारचे परवानगी घेऊनच दरवाढ जाहीर करण्यात आली आहे. एक लिटर दुधाला 3 रु. दरवाढ केली आहे. तर अर्ध्या लिटरमध्ये 10 मिली दूध अधिक देण्यात येणार आहे. ग्राहकांना सुट्या पैशांची समस्या भेडसावू नये यासाठी निर्णय घेतला आहे. यामुळे अर्धा लि. दुधाच्या पॅकमध्ये 510 मि. लि. दूध देण्यात येणार आहेत. अर्धा लिटर दुधाचा दर उद्यापासून 21.50 रु. दर होतो. 50 पैसे सुट्टे मिळत नसल्याने 10 मिलि दूध अधिक देण्यात येईल. दूध दरवाढीने महामंडळाला होणारा नफा उत्पादकांना देण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील 23 लाखांहून अधिक दूध उत्पादकांना दरवाढीचा फायदा होणार आहे

बस भाडेदरातही आजपासून वाढ

कर्नाटक राज्य परिवहन मंडळाने भाडे वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अंमलबजावणी 1 ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. परिणामी सहलींसाठी भाडेतत्त्वावर बस घेणार्‍यांना फटका बसणार आहे. यामुळे प्रति किमी दर 2 ते 5 रुपयांनी वाढणार आहे. वाढत्या इंधनवाढीमुळे परिवहन मंडळाने भाडे वाढीचा निर्णय घेतला आहे. किमान 350 किमी इतकी प्रवास मर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे लांब पल्ल्यासाठीच बस उपलब्ध होणार आहे. कमी अंतरासाठी बस भाडे घेताना अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. सध्या सामान्य बसच्या प्रवासासाठी प्रति किमी 47 रु. तर आंतरराज्य प्रवासासाठी प्रति किमी 50 रुपये भाडे आहे. त्यामध्ये 2 ते 5 रु. भाडेवाढ करण्यात आली आहे. याचा फटका शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना बसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT