नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : आर्थिक विवंचनेतून एका उद्योजकाने मंगळवारी कारमध्ये पेटवून घेत आत्महत्या केली हाेती. कारमधील पत्नी व मुलालाही संपविण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये जखमी झालेल्या पत्नी संगीता भट (वय५७) यांचा आज ( दि. २४) सकाळी उपचारादरम्यान (रविवार) मृत्यू झाला.
वर्धा मार्गावरील खापरी पुनर्वसन परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती. रामराज गोपालकृष्ण भट (वय ६३) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. रामराज यांचे वेल्डिंग आणि नटबोल्टचे दुकान आहे. ते जयताळा परिसरात पत्नी संगीता आणि मुलगा नंदन यांच्यासोबत राहत होते. नंदन हा अभियंता होता. त्यांनी लेथ मशिनचे दुकान टाकण्यासाठी कर्ज घेतले होते; पण व्यवसाया नुकसान झाल्याने त्यांच्यावर कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत गेला. त्यामुळे ते त्रस्त झाले होते.
मंगळवारी रामराज यांनी हॉटेलमध्ये जेवायला जाऊ, असे सांगून पत्नी व मुलाला घेऊन गेले. यावेळी त्यांनी आधी विषारी औषधप्राशन केले. त्यानंतर स्वत:सह पत्नी व मुलाला कारमध्येच पेटवून घेत आत्महत्या केली. सुदैवाने पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले हाेते. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान पत्नी संगीता यांचाही मृत्यू झाला.
हेही वाचा :